शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पुणे- नगर महामार्गावर अवजड वाहनांना बंदी : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 19:27 IST

शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती,

ठळक मुद्देरस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना , सहा वर्षात अपघातात ३२३ मृत्यु सकाळी सहा ते साडेआठ तसेच सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये बंदी राहणार

कोरेगाव भीमा : वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणे नगर महामार्गावरील रस्त्यावर भर म्हणुन की काय दररोज सायंकाळच्या सुमारास अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीतुन प्रवाशांची सुटका करण्यासाठी पुणे-नगर महामार्गावर ठराविक वेळेत सकाळ-संध्याकाळ अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे.        शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण चौक तसेच पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी आणि शिक्रापूर चाकण रस्त्यावरील करंदी फाटा येथे नेहमीच वाहतूककोंडी होत असल्यामुळे परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच कामगार त्रस्त झाले आहेत. त्यातच भर म्हणुन रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कामगार वर्गाला कामावर ने-आण करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बसेस व चारचाकी वाहने या रस्त्यावरुन धावत असतात. तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि या रस्त्यावरून प्रवास करत रुग्णांना रुग्णालयात नेणा-या रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा सामना करावा लागत होता, अनेकदा पुणे- नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी हा चचेर्चा विषय बनत होता आणि वाहतूककोंडीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण तर झाला आहेच शिवाय या महामार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांनाही वेळेच्या विलंबाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.       यापूर्वी शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती. त्यापत्रानुसार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मोटार वाहन कायद्यानुसार, पुणे- नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा ते कोंढापुरी तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते वाजेवाडी चौफुला या दरम्यान अवजड वाहनांना प्रायोगिक तत्वावर तीस दिवस बंदी घातली असून त्या आदेशावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत, त्यामुळे आता पुणे नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा ते कोंढापुरी तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर शिक्रापूर ते वाजेवाडी चौफुला या दरम्यान अवजड वाहनांना सकाळी सहा ते साडेआठ तसेच सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेमध्ये प्रवास करण्यास बंदी राहणार असून बंदीच्या कामामध्ये सदर वाहने ही नगर बाजूकडून येणारी वाहने कोंढापुरी येथील खंडाळा माथा तर पुणे बाजूकडून येणारी वाहने तुळापुर फाटा परिसरात वाहनचालकांच्या सोयीनुसार पार्किंग करण्यात येतील असे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे................सहा वर्षात पुणे-नगर महामार्गावर अपघातात ३२३ व्यक्ती मयत   पुणे नगर महामार्गावर सन २०१३ ते २०१८ या सहा वर्षात शिक्रापूर (ता. शिरूर ) व लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ११४७ अपघातामध्ये ३२३ व्यक्ती मयत आणि ५७० व्यक्ती जखमी झाले आहेत. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर सकाळी सहा ते साडे आठ व संध्याकाळी पाच ते रात्री दहा याकाळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असुन नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनांवर कारवाई सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास शेळके यांनी दिली, 

टॅग्स :PuneपुणेAhmednagarअहमदनगरhighwayमहामार्गfour wheelerफोर व्हीलर