शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांच्या मिरवणुकांना बंदी; विसर्जन करताना गर्दी टाळा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 11:16 IST

नागरिकांनी देखील बाप्पाचे विसर्जन करताना गर्दी करू नये..

ठळक मुद्देजिल्ह्यात गणेश विसर्जनानिमित्त कुठेही गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशजिल्ह्यात गणेश विसर्जनानिमित्त कडक बंदोबस्त

पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्यातच आज (दि.१) लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारच्या विसर्जन मिरवणुका काढण्यास व नदी, तलावात सार्वजनिक विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळेच नागरिकांनी देखील बाप्पाचे विसर्जन करताना गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

याबाबत देशमुख यांनी सांगितले, जिल्ह्यात गणेश विसर्जनानिमित्त कुठेही गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश सर्व पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. याशिवाय शासनाच्या आदेशानुसार श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नयेत. विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, मूर्तिदानासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहनदेखील देशमुख यांनी केले.जिल्ह्यात गणेश विसर्जनानिमित्त कडक बंदोबस्त जिल्ह्यात मंगळवारी सुमारे २ हजार सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन होणार असून, त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार कोणालाही विसर्जन मिरवणूक काढण्यात परवानगी देण्यात आलेली नाही.Þ विसर्जनासाठी ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मूर्तिदान उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्व गावांत, होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दल, विशेष पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcollectorजिल्हाधिकारी