शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भामा-आसखडेचे आवर्तन पाडले बंद, धरणग्रस्त आंदोलक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 02:52 IST

भामा आसखेड धरणामधून अत्यंत गोपनीय पद्धतीने गुरुवारी सायंकाळी सोडण्यात आलेले आवर्तन शुक्रवारी धरणग्रस्तांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे बंद करण्यात आले. या वेळी आक्रमक धरणग्रस्तांनी ‘लाभक्षेत्रामधून आम्हाला वगळा, अशी मागणी करता; मग आवर्तन कशाला पाहिजे,’ असा सवाल करीत आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

पाईट  - भामा आसखेड धरणामधून अत्यंत गोपनीय पद्धतीने गुरुवारी सायंकाळी सोडण्यात आलेले आवर्तन शुक्रवारी धरणग्रस्तांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे बंद करण्यात आले. या वेळी आक्रमक धरणग्रस्तांनी ‘लाभक्षेत्रामधून आम्हाला वगळा, अशी मागणी करता; मग आवर्तन कशाला पाहिजे,’ असा सवाल करीत आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.भामा आसखेड धरणावरून काल सायंकाळी ६ वाजता ७५० क्युसेक्स वेगाने सांडव्यावाटे आवर्तन सोडण्यात आले होते. याबाबत कार्यकारी अभियंता लोंढे यांच्या तोंडी आदेशाने आवर्तन सोडण्यात आले असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. रात्रीमधून अत्यंत गोपनीयरीत्या कोणालाही कोणतीही पूर्वकल्पना न देता आवर्तन सोडल्याने धरणग्रस्त आक्रमक होऊन भामा आसखेडच्या परिसरात जमा झाले होते.याबाबत करंजविहिरे येथे भामा आसखेड कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, शाखाधिकारी भारत बेंद्रे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैैठक झाली. यामध्ये सांडव्यावाटे सोडण्यात येणारे आवर्तन त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात आली. या वेळी सत्यवान नवले, बळवंत डांगले, किसन नवले, गणेश नवले, धोंडिभाऊ कुडेकर, रोहिदास जाधव, गणेश जाधव, मंदार डांगले, सचिन कुडेकर, सचिन डांगले आदी धरणग्रस्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.भामा आसखेडचे उन्हाळी आवर्तन १ एप्रिल रोजी सोडण्यात येत असते. परंतु भामा आसखेड धरणग्रस्तांनी २२ मार्चपासून आंदोलन सुरू केले असून आवर्तन सोडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाआवर्तन सोडू दिले नाही.तर किंमत मोजावी लागेल... या वेळी धरणग्रस्तांनी कोणत्याही छुप्या पद्धतीने पाणी सोडल्यास वा कोणतेही काम छुप्यारीत्या करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल, असा इशारा या वेळी दिला.लोकप्रतिनिधींची दुटप्पी भूमिकाभामा आसखेड धरणातून नदीपात्रामधून आवर्तन सोडल्यास हवेली, दौंड, शिरूर तालुक्यातील ८ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरण्यात येत असतात. यामुळे या तिन्ही तालुक्यांतील शेतीला पाणीपुरवठा होत असतो. या तिन्ही तालुक्यातील आमदारांनी भामा आसखेडचे लाभक्षेत्र वगळण्याची मागणी केली आहे. लाभक्षेत्राचे शिक्के काढण्याची एकीकडे मागणी करीत असून दुसरीकडे शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत. हा विरोधाभास लक्षात घेऊन पाणी सोडण्यासाठी धरणग्रस्तांचा तीव्र विरोध आहे.पोलीस बंदोबस्त... भामा आसखेडवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हवालदार विलास गोसावी, चंद्रकांत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी