शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे विशेष उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 12:09 IST

दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी हा यामागील उद्देश आहे...

ठळक मुद्देजगभरात बांबूच्या सुमारे सतराशे प्रजाती सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च असून या कामासाठी दोन ते अडीच वर्षे पहिल्या टप्प्यात साधारण २२ प्रजातींची रोपे खरेदीची प्रक्रिया सुरू

पुणे: तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे. बांबू वनस्पतीची बहुउपयोगीता पुढील पिढीला समजावी, हा उद्देश ठेवून हे उद्यान पुढील दोन वर्षांत बहरेल, असा विश्वास पुणे महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली.     तळजाई टेकडी पुणे शहराला पर्यावरणदृष्टया वरदान ठरलेली आहे. वनविभागाच्या शेकडो एकर जागेमध्ये वनसंपदा टीकून असून ती वृद्धिंगत करण्यासाठी वनविभाग, महापालिका आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांचे योगदान लाभले आहे. तसेच या टेकडीचा बराचसा भाग हा महापालिकेच्या ताब्यात असून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यावरण प्रेमींच्या मदतीने तिचे जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. ऑक्सिजन पार्क, स्मृतीवन अशा संकल्पना राबवून नवनवीन वृक्षराजींची त्यामध्ये भर घातली असून महापालिकेने याठिकाणी मोठ्याप्रमाणात सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकतेच येथील पठारावर क्रिकेट स्टेडीयमसोबत ओपन जिम, जॉगींग ट्रॅकचीही निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लवकरच एका बांबू उद्यानाची भर पडणार आहे.    यासंदर्भात बोलताना उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले, की कै. स.दू. शिंदे स्टेडीयमसमोरील पाच एकर जागेमध्ये हे बांबू उद्यान उभारण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी हा यामागील उद्देश आहे. जगभरात बांबूच्या सुमारे सतराशे प्रजाती आहेत. परंतू, आपल्याकडील वातावरणात साधारण १०८ प्रजातींची लागवड होवू शकते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात साधारण २२ प्रजातींची रोपे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानंतर या उद्यानामध्ये पॅगोडा, सिमाभिंतही बांबूचीच असेल. तसेच बांबूच्या विविध प्रजाती आणि उपयोगाची माहितीही देण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च असून या कामासाठी दोन ते अडीच वर्षे लागतील.   सध्या क्रिकेट स्टेडीयम व परिसरातील झाडे जगविण्यासाठी सहकारनगर येथून वाहणा-या आंबिल ओढ्यातील ग्रे वॉटर वापरण्यात येते. बांबू उद्यान विकसित करण्यासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. सहकारनगर येथे कात्रज तलावातून निघालेला उच्छवास आहे. या उच्छवासाचे पाणी पंपिंग करून टेकडीवर पाण्याची टाकी बांधून तेथे घेण्यात येणार आहे. यासाठीही निविदा काढण्यात आली आहे. लवकरच या कामालाही सुरूवात होईल, असे घोरपडे यांनी नमूद केले. 

टॅग्स :PuneपुणेSahakar NagarसहकारनगरTaljai Tekdiतळजाई टेकडीenvironmentवातावरण