ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST2021-06-16T04:13:44+5:302021-06-16T04:13:44+5:30
जिल्हा युनियनने जाहीर केलेप्रमाणे शनिवारी ६ तालुके व रविवारी ७ तालुक्यांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये हवेली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ...

ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब गावडे
जिल्हा युनियनने जाहीर केलेप्रमाणे शनिवारी ६ तालुके व रविवारी ७ तालुक्यांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये हवेली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची एकत्रित बिनविरोध होण्यासाठी सभा घेण्यात आली. राज्याचे कार्याध्यक्ष अनिल कुंभार यांनी मागील ५ वर्षात केलेले काम पाहता यावर्षीची निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती सर्व सभासदांना केली. त्याप्रमाणे सर्व सभासदांचे मत जाणून घेतल्यानंतर वरिष्ठ पदाधिकारी मधुकर दाते, अमोल घोळवे, विभागीय अध्यक्ष कानिफनाथ थोरात, संतोष नेवसे, यशवंत डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव वेताळ, महिला उपाध्यक्ष सविता भुजबळ, कोषाध्यक्ष सतीश चव्हाण, सहसचिव नथु ढवळे, सदस्यपदी लक्ष्मण शिंगाडे, आनंदा कांबळे, बापु गव्हाणे, महिला सदस्य स्वाती बोराटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हरिभाऊ पवार, प्रल्हाद पवार, धनराज क्षीरसागर, तुकाराम पाटील आदींनी प्रयत्न केले. निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून श्रीकांत वाव्हळ, संतोष डफळ, रविंद्र गोसावी, गंगाधर देशमुख, राजेंद्र सात्रस यांनी काम पाहिले.
फोटो : १. बाळासाहेब गावडे (ग्रे शर्ट) २. अनिल बगाटे (व्हाईट शर्ट)