बकरी ईदनिमित्त नमाजपठण
By Admin | Updated: September 25, 2015 00:56 IST2015-09-25T00:56:03+5:302015-09-25T00:56:03+5:30
बकरी ईदनिमित्त २४ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड, बोपोडी, खडकीतील विविध ठिकाणच्या ईदगाह आणि मशिदीत सामुदायिक नमाजपठण होणार आहेत.

बकरी ईदनिमित्त नमाजपठण
पिंपरी : बकरी ईदनिमित्त २४ सप्टेंबरला पिंपरी-चिंचवड, बोपोडी, खडकीतील विविध ठिकाणच्या ईदगाह आणि मशिदीत सामुदायिक नमाजपठण होणार आहेत. सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत मौलानांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाजपठण होईल, असे विविध मशिदींच्या विश्वस्तांनी कळविले आहे.
पिंपरीतील जामा मशिदीत जमात ए लतिफिया ट्रस्टतर्फे मौलाना नशिबबुल्लाह यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वाआठला, नेहरूनगर येथील तवकल्ला जामा मशिदीत त्याच वेळी मौलाना सय्यद अबुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली नमाजपठण होईल. फुगेवाडीतील जामा मशिदीत सकाळी साडेसातला मौलाना अश्फाक तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठणाच्या कार्यक़्रमाचे नियोजन आहे. पिंपळे गुरव, सुदर्शननगर येथील इशायते दिन मदरसा येथे सकाळी आठला मौलाना अतिकुर रहिमान यांच्या मार्गदर्शनाखाली, खडकीतील जामा मशिदीत सुन्नत वल जमाततर्फे सकाळी १०ला मौलाना नजीर अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक कार्यक्रम होणार आहे. बोपोडी गावठाण येथील जामा मशिदीत सकाळी ८ला मौलाना असदुल्लाह खान यांच्या उपस्थितीत नमाजपठण होईल. दापोडीतील तय्यब मशिदीत सकाळी साडेसातला मौलाना शफी, मदरसा फैजू अलम येथे साडेसातला मौलाना कारी इक्बाल, जमाअतुल जामा मशिद येथे सकाळी ८ला मौलाना मुफ्ती अबुझर, दापोडी कब्रस्तान मशिद येथे सकाळी साडेआठला मौलाना नझीर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाजपठण होणार आहे. (प्रतिनिधी)