शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शक्तिप्रदर्शन करणाऱ्या गजा मारणेला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:20 IST

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर, कोथरूडमध्ये शक्तिप्रदर्शन केल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणे व त्याच्या साथीदारांची न्यायालयाने प्रत्येकी १५ ...

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर, कोथरूडमध्ये शक्तिप्रदर्शन केल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणे व त्याच्या साथीदारांची न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बुधवारी (दि. १७) जामिनावर मुक्तता केली.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. गजा मारणेला न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गजा मारणे आणि शरद मोहोळ या दोघांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकाचवेळी न्यायालयात आणण्यात आल्याने पोलिसांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण होते.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होता कामा नये याकरिता पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या दोनशे साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मारणेसह ९ जणांना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकी २७ जणांची नावे निष्पन्न झाली. यात गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७), गणेश नामदेव हुंडारे (३९), रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०) श्रीकांत संभाजी पवार (वय ३४) आणि सचिन आप्पा ताकवले (वय ३२) यांना अटक करण्यात आली होती.

अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. या वेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरडा केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरबन ४०० ते ५०० अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोथरुडमध्ये मंगळवारी (दि. १६) रात्री गजा मारणे व समर्थकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून हमराज चौकातील गणपती मंदिरात विनापरवाना आरती केली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

गुन्ह्यातील दोनशे ते अडीचशे साथीदार आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या तीनशे गाड्या जप्त करायच्या आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी कोणी आर्थिक सहाय्य केले याचा तपास करायचा आहे, यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने मारणे आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

दरम्यान, मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देखील याच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात देण्याची मागणी देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली.

-------------------------------------------------------------------------