निकृष्ट शीतपेय विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: April 14, 2017 04:35 IST2017-04-14T04:35:40+5:302017-04-14T04:35:40+5:30
काही दिवसांपासून शहराचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. तापलेल्या वातावरणात थंड होण्यासाठी नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांकडून

निकृष्ट शीतपेय विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
पुणे : काही दिवसांपासून शहराचा पारा चांगलाच वाढत चालला आहे. तापलेल्या वातावरणात थंड होण्यासाठी नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत आहेत. त्यामुळे शहरातील विक्रेत्यांकडून आयोग्याला अपाय न पोहोचवणाऱ्या शीतपेयांची विक्री केली जाते का? याबाबतची तपासणी मोहीम अन्न व औषध प्रशासनाने हाती घेतली आहे. निकष्ट शीतपेयांची विक्री करणाऱ्यांवर एफडीएकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
शीतपेय तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. तसेच, विक्रेत्यांनी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात एफडीएने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात शीतपेय तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
तसेच, शहरातील बर्फनिमिर्ती करणाऱ्या उद्योजकांच्या केंद्रांची पाहणी केली जाईल. त्यातही प्रामुख्याने ‘पेप्सी कॅन्डी’चे नमूने घेतले जाणार असून पेप्सी कँडीत वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी प्रयोगशाळेत केली जाईल. त्यात निकृष्ट दर्जाच्या पाण्याचा वापर केल्यास तसेच पदार्थांची विक्री केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील विविध कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल्सची विक्री केली जाते. (प्रतिनिधी)
- एफडीएचे सहायक संचालक संजय शिंदे म्हणाले, ‘‘एफडीएकडून शीतपेय तपासणी मोहीम हाती घेतली असून जिल्ह्यातील २४ अधिकारी विविध ठिकाणी जाऊन शीतपेय विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या पदार्थांची तपासणी करणार आहेत. विक्रेत्यांकडील पदार्थांमध्ये काही दोष आढळून आल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत पाठविले जातील.’’