शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेचे तीन-तेरा; प्लॅटफॉर्मवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 14:16 IST

स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे....

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर रेल्वे स्थानकाच्या समस्यांसंदर्भात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हाणामारी करणार्‍या दोघांमधील एक जण दुसर्‍याला डोक्यापर्यंत उचलून-उचलून आपटत होता आणि खाली पडणार्‍या व्यक्तीचे डोके आपटल्याचा जोरजोरात आवाज येत होता. ही घटना येथे घडणारी पहिली नसून, येथे अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून, स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरच ‘गुंडाराज’ सुरू असल्याचे दिसत आहे.

यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असून, प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहे.

या रेल्वे स्थानकापेक्षा नव्याने शहरात तयार झालेल्या मेट्रो स्थानकाची सुरक्षा मजबूत असल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगामी काळात घडणारी अनुचित घटना टाळण्यासाठी आत्ताच ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा अनेक जिवांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकCrime Newsगुन्हेगारी