शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:56 IST

एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

ठळक मुद्दे२०१६-१७ शैक्षणिक वर्षातील रक्कम मिळालेली नाही 

पुणे : केंद्र शासनाकडून निधीच उपलब्ध न झाल्यामुळे फिल्म अँंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया ( एफटीआयआय) मधील तीन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना  २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीची रक्कम अद्यापही मिळालेली नाही.    केंद्राकडून निधी मिळाल्यामुळे यंदाच्या वर्षात ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी शिष्यवृत्तीची रक्कम मिळेल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे विद्यार्थ्याँनी दुस-या वर्षीच्या शिष्यवृतीचे नूतनीकरणच केले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. एफटीआयआय ही शासकीय संस्था असल्याने काही प्रवेश एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर आॅनलाईन माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करतात. त्यातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर केंद्राकडून संस्थेला निधी देण्यात येतो. त्यानुसार त्याची रक्कम विद्यार्थ्यां खात्यात जमा केली जाते. मात्र २०१६-१७ मध्ये दिग्दर्शन, अभिनय यांसारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना अद्यापही त्या शैक्षणिक वर्षाची रक्कम मिळाली नसल्याचे समोर आले आहे. या शिष्यवृत्तीची रक्कम ही ८५ हजार ते १ लाख रूपयांपर्यंत असल्याने विद्यार्थ्यांनी संस्थेतील शैक्षणिक विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम लवकरच खात्यात जमा होईल असे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या शैक्षणिक वर्षामधील रक्कम किमान २०१७ च्या जून-जुलै मध्ये तरी मिळणे अपेक्षित होते. मात्र, २०१८ उजाडले तरी ती रक्कम मिळालेली नाही. पहिल्याच वर्षीची रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने दुस-या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे आम्ही नूतनीकरणच केले नाही. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाल्याचे विद्यार्थ्यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले.यासंदर्भात एफटीआयआयच्या शैक्षणिक विभागातील संबंधित अधिका-याशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्राकडून निधीच उपलब्ध न झाल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्याँना शिष्यवृत्तीची रक्कम देण्यास विलंब लागला असल्याची कबुली दिली. दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण हे जून-जुलै मध्ये करावे लागते विद्यार्थ्यांनी ते केले नसेल तर ते शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थी