शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वासुंदेत नवजात अर्भकाचा मृत्यू, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा मातेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 02:24 IST

एकीकडे नवजात मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, वासुंदे येथील आरोग्य केंद्रात योग्य आणि वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचा आरोप नवजात अर्भकाच्या मातेने केला.

वासुंदे - एकीकडे नवजात मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, वासुंदे येथील आरोग्य केंद्रात योग्य आणि वेळेत सुविधा न मिळाल्याने दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकाचा शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याचा आरोप नवजात अर्भकाच्या मातेने केला.वासुंदे येथील मनीषा राजेंद्र जांबले ही माता गुरुवारी (दि. २४) पहाटे घरीच सुखरूप प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्यानंतर मुलाचे वजन कमी असल्याचा संशय आल्याने तिने तत्काळ १०८ नंबरला फोन करून माहिती दिली. तसेच, गावातील उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या आरोग्यसेविकेसही याबाबतची कल्पना दिली. यानंतर १०८ नंबरच्या गाडीत बसून बाळंतीण, तिचा पती व कुटुंबातील इतर व्यक्ती पुढील उपचारांसाठी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होण्यासाठी गेले. मात्र, पहाटेच्या सुमारास कुरकुंभ येथील आरोग्य केंद्राचे मेन गेट बंद दिसल्याने ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय दौंड येथे गेली. या वेळी या रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाºयांनी नॉर्मल डिलिव्हरी झाली असताना आपण कशासाठी आलात, असा प्रश्न विचारला. त्या वेळी अर्भकाच्या मातेने सांगितले, की ‘मला बाळाचे वजन कमी असल्याचे वाटते. तसेच पहिल्या बाळंतपणा वेळी माझा रक्तदाब कमीजास्त होत होता. त्यामुळे आम्ही दवाखान्यात आलो असून, मला पुढील उपचारांसाठी अ‍ॅडमिट करून घ्या.’यानंतर रुग्णालयातील कर्मचाºयांनी बाळाचे वजन व्यवस्थित असल्याचे सांगितले व भरती करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगून बाळ-बाळंतणीला घरी पाठविले. मात्र, परत येताना कोणतीही गाडीची व्यवस्था नसल्याने एसटी बस व खासगी वाहनाने या मातेला घरी यावे लागले.त्यानंतर शनिवारी पहाटे या अर्भकाचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनीच योग्य दखल न घेतल्याने मुलाचा मृत्यू झालाचा आरोप मातेने केला आहे.मूकबधिर वडील व्यथा सागणार तरी कशी..?- हे कुटुंब मोलमजुरी करून आपली उपजीविका करते. या नवजात अर्भकाचे वडील राजेंद्र बाबूराव जांबले हे मूकबधिर आहेत. ते स्वत: मूकबधिर असल्याने त्यांना येत असलेल्या अडचणी समजत असूनही आपली व्यथा व्यक्त करू शकले नाहीत. त्यामुळे १०८ नंबरला फोन करण्यापासून ते दवाखान्यातील कर्मचाºयांना अडचण सांगण्यापर्यंत सर्व गोष्टी या प्रसूत झालेल्या मातेला कराव्या लागल्या.सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना योग्य शासकीय सेवा मिळत नसेल, तर शासकीय रुग्णालये कशासाठी आहेत? आज एका मूकबधिर कुटुंबावर आरोग्य विभागाच्या असंवेदनशीलतेमुळे एका निष्पाप मुलाला मुकावे लागले आहे. आजच्या प्रगत युगात मुलं होण्यासाठी कितीतरी मातापित्यांना लाखो रुपयांचा खर्च होऊनही पुत्रप्राप्ती होत नसल्याच्या अनेक घटना समाजासमोर आहेत. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.-नंदा जांबले, सरपंच ग्रामपंचायत वासुंदेमला या घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या मी रजेवर असल्याने दोन दिवसांत घटनेची सविस्तर माहिती घेण्यात येईल.- राजेंद्र पाखरे, आरोग्य अधिकारीमी सध्या सुटीवर आहे. मला याबाबत रुग्णालयातील कर्मचाºयांनी माहिती दिली आहे. घडलेल्या घटनेची माहिती घेऊन जबाबदार असणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ. रूपाली पाखरे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, दौंड

टॅग्स :Deathमृत्यूPuneपुणे