शाॅटी व्हाॅलीबाॅल स्पर्धेत बाबू उंब्रज संघाने मिळविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:05+5:302021-02-05T05:06:05+5:30

या स्पर्धेचे उद्घाटन धोंडिभाऊ पिंगट, जयवंत घोडके, पप्पू गुंजाळ,वसंत जगताप,पाराजी बोरचटे,अतुल भांबेरे,अशोक घोडके,विठ्ठल गुंजाळ आणि माजी खेळाडू आदी मान्यवरांच्या ...

Babu Umbraj won the first place in the Shati Volleyball Tournament | शाॅटी व्हाॅलीबाॅल स्पर्धेत बाबू उंब्रज संघाने मिळविला प्रथम क्रमांक

शाॅटी व्हाॅलीबाॅल स्पर्धेत बाबू उंब्रज संघाने मिळविला प्रथम क्रमांक

या स्पर्धेचे उद्घाटन धोंडिभाऊ पिंगट, जयवंत घोडके, पप्पू गुंजाळ,वसंत जगताप,पाराजी बोरचटे,अतुल भांबेरे,अशोक घोडके,विठ्ठल गुंजाळ आणि माजी खेळाडू आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.या ठिकाणी एकूण ३२ संघ सहभागी झाले होते.या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी माजी आमदार शरद सोनवणे,जानकू डावखर,नीलेश पिंगट आदींनी भेट दिली.तर द्वितीय क्रमांक ओतूर संघाने मिळविला.तृतीय क्रमांक खडकी पिंपळगाव संघाने मिळविला.चतुर्थ क्रमांक ओझरच्या संघाने मिळविला.पाचवा क्रमांक भैरवनाथ स्पोर्टस् क्लबने मिळविला. प्रत्येक विजयी संघास रोख बक्षीस,चषक व प्रत्येक नेटमनसाठी मेडल देण्यात आले.या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन भैरवनाथ स्पोर्टस् क्लबने केले होते.

फोटो खालील मजकूर पुढीलप्रमाणे आहे.

बेल्हा( ता.जुन्नर) येथील शाॅटी हाॅलिबाॅल स्पर्धेत प्रथम क्रमांक विजयी संघास चषक प्रदान करताना मान्यवर दिसत आहेत.

Web Title: Babu Umbraj won the first place in the Shati Volleyball Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.