शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
5
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
6
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
7
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
8
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
9
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
10
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
12
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
13
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
14
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
15
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
16
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
17
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
18
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
19
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
20
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट

"...म्हणून जाणता राजा नाटक बघताना पुलंनी मागितली होती बाबासाहेबांची माफी"

By अतुल चिंचली | Updated: July 29, 2021 17:30 IST

महानाट्यातील कलाकारांच्या भावना; २०० ते ३०० कलाकारांच्या एकत्रित शक्तीच्या आधारे महानाट्याचे प्रयोग पार पडत असे

ठळक मुद्देबाबासाहेबांनी महानाट्यासाठी सात ते आठ हजार लोकांचे एक कुटुंब तयार केले

पु.ल. देशपांडे एकदा जाणता राजा नाटक पाहायला आले होते. पण त्यांना नाटक पूर्ण पाहता आले नाही. याबद्दल पुलंनी बाबासाहेबांची माफी मागितली. पुल म्हणाले, नाटकातले प्रसंग इतके खरेखुरे वाटत होते. की माझ्या डोळ्यात सातत्याने अश्रू येत होते. त्यामुळे मला अश्रूंमुळे धूसर दिसू लागले आणि मी नाटक पूर्ण पाहू शकलो नाही. इतके खरेखुरे महाराज आणि त्यांचे स्वराज्य माझ्यासमोर नाटकातून अवतरले होते.

आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त लोकमतने जाणता राजा महानाट्यात काम करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या कलाकारांनी आठवणींना उजाळा दिला आहे. त्यापैकी एक पुलंची आठवण एका कलाकाराने सांगितली   जाणता राजा हे महानाट्य पाहताना खरोखरच आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असल्याची अनुभूती येते. हे महानाट्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी समाजसमोर आणले.  महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा, मोघलांची हार, मावळ्यांची एकी, युद्ध प्रसंग, वेषभूषा, आणि नैपथ्य पाहून लेखक, दिग्गजांचेही अश्रू अनावर झाले. २०० ते ३०० कलाकारांच्या एकत्रित शक्तीच्या आधारे महानाट्याचे प्रयोग पार पडत असे. अशाही आठवणी महानाट्यात काम केलेल्या कलाकारांनी सांगितल्या आहेत. 

संपूर्ण जगात या महानाट्याचे हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग झाले तरी भारतातही अनेक राज्यांत हिंदी भाषेत जाणता राजा नाटक होत असे. १९८४ ला जाणता राजाचा पहिला प्रयोग झाला होता. बाबासाहेब इंग्लडमध्ये गेल्यावर त्याठिकाणी पाहिलेले मोठमोठे पुतळे, प्रतिमा यावरून नाट्यप्रयोगाची कल्पना सुचली. ते अमलात आणण्यासाठी एक कुशल संघटक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

जाणता राजा या महानाट्यात सर्वांना प्रवेश दिला जात असे. त्यांनी या महानाट्यासाठी सात ते आठ हजार लोकांचे एक कुटुंब तयार केले. कलाकारांकडून कधी चुका झाल्या तर चारचौघांत ओरडले नाहीत. पण जाणूनबुजून केलेल्या चुकीला त्यांनी कधीच माफ केले नाही, अशी शिस्तबद्ध शिकवण त्यांच्याकडून अनुभवायला मिळत असल्याचे कलाकार म्हणतात.

नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रतील अनेक जिल्हयात फिरायला मिळत असे. देशातील बऱ्याच राज्यात जाण्याची संधीही कधी हुकवली नाही. नागपूर मधील रामटेक, कोल्हापूर मधील पन्हाळगड, पुरंदर, राजगड, शिवनेरी असे किल्ले, तसेच पर्यटन स्थळेही पाहायला मिळत होती. इतिहास - भूगोलाचा अभ्यास नाटकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिला. जगण्याची पद्धत, कुटुंबाची शिस्तप्रियता याची सवयही बाबासाहेबांनी लावून दिली होती.

मावळे, अष्टप्रधान मंडळी, महाराज, मोघल, सहकारी, वासुदेव, गोंधळी, शेतकरी अशा लहानांपासून मोठ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच नाटकातील लहानशी चूक त्यांच्या पटकन लक्षात येत असे. ती वेशभूषेच्या बाबतीत असो वा अभिनय, नैपथ्य यासंदर्भात असो. प्रयोगात कुठल्याही पात्राची कमतरता भासल्यास बाबासाहेब स्वतः ते पात्र साकारत असत.

नाटकातले प्रसंग 

- रमणबाग शाळेतील एका प्रयोगात वासुदेव हे पात्र करणारा व्यक्ती येऊ शकला नाही. त्याच क्षणी बाबासाहेबांनी कुठलाही विचार न करता तातडीने वासुदेवाचा अंगरखा चढवला. डोक्याला मोरपीस लावून ते रंगमंचावर आले.- शाहिस्तेखानाच्या कव्वालीच्या प्रसंगात कव्वाली करणाऱ्याची वेशभूषा चुकली होती. पण ती लोकांच्या निदर्शनास आली नाही. बाबासाहेब त्यावेळी रंगमंचाच्या समोर बसले होते. त्यांना मात्र ही गोष्ट लक्षात आली. प्रसंग संपताच बाबासाहेब रंगमंचाच्या खालून स्टेजच्या मागे गेले. कव्वाली करणाऱ्या कलाकाराला त्याची चूक दाखवली.

कार्यशाळेत बाराबंदी - फेटा बांधण्याबरोबरच पगडी कशी घालावी हेही बाबासाहेबांनी शिकवले. तर धोतर नेसण्याची खरी पद्धत त्यांनीच आम्हाला शिकवली. मावळ्यांनी मुजरा कसा करावा यापासून छत्रपतींच्या अभिनयापर्यंत सगळीकडे बाबासाहेब लक्ष देत असे. देशभरातून ७ ते ८ हजार लोकांना एकत्र आणून बाबासाहेबांनी जाणता राजा महानाट्य बसवले आहे.

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMaharashtraमहाराष्ट्र