शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य समाजासाठीच : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 14:15 IST

शरद पवार म्हणाले, ९५ वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो.

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी वेचले आहे. या वयात बाबा आढाव सक्रियपणे काम करत आहेत. आजही ते विधायक कामे करत आहेत. आपण त्यांचा शंभरावा वाढदिवस लवकरच साजरा करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी बाबा आढाव यांना शुभेच्छा दिल्या.पुण्यातील मार्केट यार्डमधील हमाल पंचायतीच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ९५ वा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य काही लोकांनाच मिळते. मोजक्या लोकांच्या जीवनात हा क्षण येतो. बाबा आढाव आजही विधायक कामे करत आहेत. अन्याय अत्याचार विरोधात लढत आहेत. सामान्य माणसांचे ओझे हलके करण्याचे काम करत आहेत.

आपणा सर्वांसाठी ते मोठे आदर्श आहेत. कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थिरता कशी येईल, त्याचा सातत्याने विचार करत बाबा काम करत राहिले. संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी काम करत त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी नेहमी सामान्य माणसांचे हितच पाहिले आहे. उपेक्षित समाजातील लोकांना संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी ते काम करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात बाबांनी मोठे कार्य केले. आम्ही लोकांनी त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतले आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSharad Pawarशरद पवार