शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC result 2018 : गुणांच्या स्पर्धेत मुंबईने टाकले सगळयांना मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 15:51 IST

राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली

ठळक मुद्दे९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण : तब्बल ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांची बाजी

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेत राज्यभरातून ५ हजार ४८६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत, यामध्ये सर्वाधिक २ हजार २८८ विद्यार्थी एकटया मुंबई विभागाचे आहेत. त्यामुळे यंदा मुंबईच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविण्यामध्ये सगळया विभागांना मागे टाकले आहे.  राज्य मंडळाचा बारावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्यमंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे बंद केले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या मंडळाकडून जाहीर करण्यात आली.मुंबई विभागातून ३ लाख ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २८८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. त्याचबरोबर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून ३८ हजार २१४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  पुणे विभागातून २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७०० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळालेले २० हजार ८७० विद्यार्थी आहेत.  नागपूर विभागामधून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत बसले होते. यातील १ लाख ४४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी ६९८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण १० हजार ३०२ इतके आहे.औरंगाबाद विभागामधून  १ लाख ५९ हजार ०८६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. यापैकी २९४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर १६ हजार ०१६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळाले. कोल्हापूर विभागामधून १ लाख २५ हजार ६४८विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळविणाऱ्यांचे प्रमाण ८ हजार ९०५ इतके आहे. अमरावती विभागामधून १ लाख ४४ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले तर ७५ टक्क्यांपेक्षा १२ हजार ४०८ विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. नाशिक विभागातील १५६ विद्यार्थ्यांना तर लातूर विभागातील २५९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. .............५२ हजार विद्यार्थी ४५ टक्क्यांच्या आतराज्यातील ५२ हजार ६६० विद्यार्थ्यांना ३५ ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान मिळाले आहेत. ४५ ते ६० टकक्क्यांच्या दरम्यान ५ लाख ६७ हजार ८५३ विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेHSC Result 2018बारावी निकाल २०१८educationशैक्षणिकStudentविद्यार्थी