दुचाकीचा स्फोट होऊन बाप-लेक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:08 IST2021-06-11T04:08:55+5:302021-06-11T04:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरूनगर : राजगुरूनगर येथील अहिल्यादेवी चौक येथे नव्या दुचाकीचा अचानक स्फोट होऊन बाप-लेक गंभीर जखमी ...

Baap-lek seriously injured in a two-wheeler explosion | दुचाकीचा स्फोट होऊन बाप-लेक गंभीर जखमी

दुचाकीचा स्फोट होऊन बाप-लेक गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरूनगर : राजगुरूनगर येथील अहिल्यादेवी चौक येथे नव्या दुचाकीचा अचानक स्फोट होऊन बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.१०) सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

संतोष प्रभाकर शेवाळे (वय ३२) व त्यांचा मुलगा यश प्रभाकर शेवाळे (वय १०, रा. खंडोबामाळ, राजगुरूनगर), असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. संतोष प्रभाकर शेवाळे हे मुलगा यश याला घेऊन पाण्याचा मोकळा जार घेऊन पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान काही अंतरावर त्यांच्या दुचाकीच्या बॅटरीचा व पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. त्यात गाडीच्या चिंधड्या उडाल्या. संतोष शेवाळे यांच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या. तर मुलगाही गंभीर जखमी झाला. स्फोटाच्या आवाजाने नागरिक या ठिकाणी गोळा झाले. अतुल ठाकूर, लाला सावंत, शंकर बोंबले यांनी जखमी संतोष व त्यांचा मुलगा यश याला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. शेवाळे यांनी तीन महिन्यांपूर्वी दुचाकी घेतली होती. स्फोट कसा झाला याबाबत खेड पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली आहे.

फोटो ओळ : राजगुरूनगर येथे नवीन दुचाकीचा झालेला स्फोट.

Web Title: Baap-lek seriously injured in a two-wheeler explosion