‘बी. व्होक’मधून समाज परिवर्तन
By Admin | Updated: September 5, 2014 01:09 IST2014-09-05T01:09:05+5:302014-09-05T01:09:05+5:30
विद्यापीठाने सुरू केलेले बी. व्होक कोर्सेस समाजात परिवर्तन घडवून आणणारे आहेत, असे मत डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

‘बी. व्होक’मधून समाज परिवर्तन
पिंपरी : विद्यापीठाने सुरू केलेले बी. व्होक कोर्सेस समाजात परिवर्तन घडवून आणणारे आहेत, असे मत डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (आकुर्डी) येथे आयोजित बी. व्होक कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर बोलत होते.
शिक्षण पद्धतीमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची गरज लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान मंडळाच्या वतीने यावर्षीपासून 9क् विद्यापीठांमध्ये बी. व्होक कोर्सेस सुरू केलेले आहे. पुणो विद्यापीठामध्ये 9 ठिकाणी या कोर्सेसना मान्यता मिळाली असून, पुणो जिल्हा शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयासह तीन महाविद्यालयात कोर्स सुरु करण्यात आला आहे. या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुरेश कोते, ढमाले, शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, इटीएच संस्थेचे शशांक हिवरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. अभय खंडागळे, डॉ. नीलेश दांगट, रजिस्ट्रार अनिल शिंदे उपस्थित होते.
आभार प्रदर्शन प्रा. एस. जी. लखदिवे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. रश्मी मोरे यांनी केले.
नियोजन डॉ. खंडागळे, प्रा. लखदिवे, डॉ. मोरे, प्रा. चंद्रकांत रेडिकन, प्रा. संतोष जगताप, प्रा. रुपाजी जाधव, प्रा. मोनाली वायकुळे, प्रा. कीर्ती केदारी यांनी केले. (प्रतिनिधी)