टाळेबंदीची कुऱ्हाड आजपासून पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:11 IST2021-04-06T04:11:30+5:302021-04-06T04:11:30+5:30

पुणे : राज्य शासनाने रात्री आठनंतर संचारबंदी जाहीर केली असली, तरी पुण्यात मात्र सायंकाळी सहानंतरच त्याची अंमलबजावणी करण्याचा ...

The ax of lockout will fall from today | टाळेबंदीची कुऱ्हाड आजपासून पडणार

टाळेबंदीची कुऱ्हाड आजपासून पडणार

पुणे : राज्य शासनाने रात्री आठनंतर संचारबंदी जाहीर केली असली, तरी पुण्यात मात्र सायंकाळी सहानंतरच त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सातपर्यंत शहरात संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) पाळली जाणार आहे. अत्यावश्यक कारण व सेवेव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल होणार आहेत.

पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नवे आदेश सोमवारी (दि. ५) जाहीर केले. यातील मुख्य बाबी अशा -

चौकट एक

* सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध (जमावबंदी).

* सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ६ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी

* शुक्रवारी सायंकाळी ६ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत पूर्ण लॉकडाऊन

चौकट दोन

* अत्यावश्यक सेवांमध्ये हे राहील सुरू-

१) रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालय व इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा

२) किराणा, भाजीपाला, डेअरी, बेकरी, मिठाई व खाद्यपदार्थांची दुकाने

३) सार्वजनिक वाहतूक - सार्वजनिक बस, टॅक्सी, रिक्षा, रेल्वे

४) वेगवेगळ्या देशांचे राजदूत व त्यांचेशी संबंधित कार्यालये़

५) पूर्व पावसाळी नियोजित कामे

६) मालवाहतूक

७) कृषी संबंधित सेवा

८) ई-कॉमर्स

९) मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे

१०) आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे घोषित अत्यावश्यक सेवा़

चौकट

रिक्षा, टॅक्सी, चारचाकीची चलती

रिक्षा, टँक्सी कॅब, चारचाकी वाहन ही चालक अधिक आरटीओने मान्यता दिलेल्या आसन क्षमतेच्या ५० टक्के आसन क्षमतेने चालवता येईल. ही परवानगी देताना प्रत्येकास मास्क वापरणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ५०० रूपये दंड घेण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनचालक व इतर कर्मचारी यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक असून, १५ दिवसांची वैधता असणारा ‘कोविड-१९ निगेटिव्ह’ अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. परंतु, जर चालक यांनी त्यांच्या सभोवताली प्लास्टिक शीट लावले असेल तर त्यांना या दाखल्याची आवश्यकता राहणार नाही. हा नियम १० एप्रिलपासून लागू करण्यात येईल. लसीकरण प्रमाणपत्र किंवा निगेटिव्ह प्रमाणपत्र सोबत न बाळगल्यास १ हजार रूपये दंड करण्यात येईल.

चौकट

पीएमपी बस बंदच राहणार

पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपी बससेवा अत्यावश्यक सेवा वगळून ९ एप्रिल २०२१ पर्यंत पूर्णत: बंद राहणार आहे़

चौकट

खालील कार्यालये वगळून सर्व खासगी कार्यालये बंद

* सहकारी, को-ऑपरेटिव्ह, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका

* विद्युत पुरवठा कंपनी

* दूरसंचार सेवा पुरवठादार

* विमा/मेडिक्लेम कंपनी

* औषध उत्पादक

* आयटी

* वकील, सीए यांची कार्यालये व वित्तीय संस्थेशी संबंधित कार्यालये

* सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू राहतील. मात्र, कोविड-१९ संबंधित काम करणारी सर्व कार्यालये १०० टक्के उपस्थितीत सुरू राहतील़

Web Title: The ax of lockout will fall from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.