यशवंत नडगम यांना पँथररत्न पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:13 IST2021-02-16T04:13:57+5:302021-02-16T04:13:57+5:30
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण ...

यशवंत नडगम यांना पँथररत्न पुरस्कार प्रदान
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे नामदेव ढसाळ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अॅड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगरसेविका लता राजगुरू होत्या. कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
पुरस्काराला उत्तर देताना नडगम म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या पुरस्कारामुळे संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल. तरुण पिढीने महापुरुषांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.
आडकर म्हणाले, नामदेव ढसाळ जसे राजकारणी होते तसेच साहित्यिक, कवीही होते. सामाजिक प्रश्नांवर ते पोटतिडकीने बोलत. अन्यायाविरुद्ध कायम लढा देताना ते मानवी भावनांची जपणूकही करत. चांगला माणूस असणे ही जशी समाजासाठी उपयुक्त गोष्ट असते तशी माणसातील माणूस जागा असणेही गरजचे असते.
विठ्ठल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.