शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कवी म्हणून आमच्यासाठी हा पुरस्कार मानाचा : अजय-अतुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 22:56 IST

आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या लेखनाला मान देऊन प्रोत्साहित केल्यामुळे  यापुढं आम्ही लिहीत राहणार, असा विश्वास देत प्रसिद्ध संगीतकार अजय यांनी ' नटरंग' मधील 'तोडुनिया टाकलिया नाळ, कपाळी लिव्हल नाही' या स्वलिखित गीताचे बोल सादर करून रसिकांची मने जिंकली.

पुणे: प्रत्येक कवीला चाल ही सुचतेच, ठेका नसेल तर लिहायला जड जाते, त्यामुळे कवी हा संगीतकार असतो आणि संगीतकार हा कवी असतो. आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या लेखनाला मान देऊन प्रोत्साहित केल्यामुळे  यापुढं आम्ही लिहीत राहणार, असा विश्वास देत प्रसिद्ध संगीतकार अजय यांनी ' नटरंग' मधील 'तोडुनिया टाकलिया नाळ, कपाळी लिव्हल नाही' या स्वलिखित गीताचे बोल सादर करून रसिकांची मने जिंकली.    स्व.प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्रमंडळच्यावतीने यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार प्रदान सोहळा टिळक स्मारक मंदिर येथे पार पडला. याप्रसंगी डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ पी.डी पाटील, अभिनेते मकरंद अनासपुरे, रामदास फुटाणे, सचिन ईटकर, संजय ढेरे, विजय ढेरे उपस्थित होते.      यावेळी गायक आणि संगीतकार अजय-अतुल यांना पी.डी पाटील आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते कै. प्रकाश  ढेरे  स्मृतीप्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 25 हजार रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय रावसाहेब कुवर (साक्री), अनुजा जोशी( गोवा) आणि पी. विठ्ठल यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देण्यात आला. 11 हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे.      आजवर संगीतकार, गायक म्हणून खूप पुरस्कार घेतले पण कवी म्हणून आमच्यासाठी हा पुरस्कार मानाचा आहे अशी भावना अतुल यांनी व्यक्त केली. गीतकार आणि कवी वेगळे करू नका याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PuneपुणेAjay-Atulअजय-अतुल