हिंदी प्रचार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:15+5:302021-06-22T04:09:15+5:30

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी उपस्थित होते. या वेळी डॉ. अशोक कामत यांना संत साहित्य ...

Awarded on the occasion of the anniversary of Hindi Prachar Sangh | हिंदी प्रचार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार प्रदान

हिंदी प्रचार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार प्रदान

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी उपस्थित होते. या वेळी डॉ. अशोक कामत यांना संत साहित्य पुरस्कार, सदानंद महाजन यांना डॉ. प्रथमवीर पुरस्कार, डॉक्टर विद्या चिटको यांना कल्पना चावला पुरस्कार, डॉ. वासंती साळवेकर यांना विवेकानंद पुरस्कार, शरद पोंक्षे यांना सावरकर पुरस्कार, डॉ. दामोदर खडसे यांना साहित्य पुरस्कार, आणि विजय फळणीकर यांना सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते डॉ. दिलीप गरुड लिखित ''श्रीमंत कर्मयोगी'', स्वर्गीय गोडबोले अनुवादित ''सोनोपंत दांडेकर'', डॉ. संगीता बर्वे लिखित आणि श्रुती मोघे अनुवादित ''बालगीत हिंदी अनुवाद'' आणि पंडित रामेश्वर दयाल दुबे लिखित आणि ज.गं. फगरे यांनी संपादित केलेल्या ''बापू की बातें'' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. गं. फगरे यांनी प्रास्ताविक केले, संजय भारद्वाज यांनी आभार मानले. बंडोपंत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Awarded on the occasion of the anniversary of Hindi Prachar Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.