कृष्णा ढोकले यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:56+5:302021-02-21T04:20:56+5:30
शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध गिर्यारोहक तथा एव्हरेस्ट व कंचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांना राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे ...

कृष्णा ढोकले यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान
शेलपिंपळगाव : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध गिर्यारोहक तथा एव्हरेस्ट व कंचनगंगा शिखरवीर कृष्णा ढोकले यांना राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील याच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ढोकले हे "कामगार फिट तर महामंडळ फिट, महामंडळ फिट तर देश फिट" असा संदेश घेऊन पुणे ते मुंबई सुमारे १४० किलोमीटर सायकलने गेले होते.
या कामगिरीबद्दल राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या हस्ते ढोकले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुदाम भोरे, उद्योजक रंगनाथ घोडगे पाटील, राजेंद्र वाघ, पुरुषोत्तम सदफुलें उपस्थित होते. कृष्णा ढोकले यांनी आत्तापर्यंत सह्याद्रीत ७० पेक्षा अधिक गिर्यारोहण मोहिमा केल्या असून सर्व मोहिमांचे नेतृत्व केले आहे. तसेच हिमालयात दहा शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. एव्हरेस्ट, कंचनगंगा, किलीमांजारो, एलब्रूस ही आंतरराष्ट्रीय शिखरे सर केली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी तर अरुण गराडे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : राळेगणसिद्धी येथे कृष्णा ढोकले यांचा सत्कार करताना पद्मभूषण आण्णा हजारे.