महादेव बोरावके सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST2021-09-12T04:13:36+5:302021-09-12T04:13:36+5:30

नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशनची स्थापना बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, भारतीय सैन्य ...

Awarded the Mahadev Boravake Social Service Pride Award | महादेव बोरावके सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

महादेव बोरावके सामाजिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशनची स्थापना बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, सुनील शिंदे, उद्योगपती सुरेश पाटील व अभियंते मनोहर वडडर यांनी केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याला कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भारतीय सैन्य दलातील अधिकारी, रत्नमाला ठाकुर, मेट्रो सिटी कोल्हापूरचे अध्यक्ष सुरेश पाटील, एसी. पी. महेश वेगण्णीकर, सांगलीचे महापौर उमेश पाटील उपस्थित होते. तसेच माळशिरस गावचे माजी सरपंच बाळासाहेब यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश गायकवाड, युवा उद्योजक संतोष यादव,सागर यादव,शंकर लोळे उपस्थित होते.

माळशिरस येथील सरपंच महादेव बोरावके यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव देण्यात आला.

Web Title: Awarded the Mahadev Boravake Social Service Pride Award