पुरस्कार लढवय्या महिलांचा
By Admin | Updated: November 10, 2014 23:08 IST2014-11-10T23:08:39+5:302014-11-10T23:08:39+5:30
ज्या महिलांवर, मुलींवर अत्याचार होतात त्या प्रत्येकीला कायद्याची जाण असेलच असे नाही. अशा स्त्रियांना कायद्याचा योग्य उपयोग करून न्याय मिळवून देणो हेच माङो कार्य आहे.

पुरस्कार लढवय्या महिलांचा
पुणो : ज्या महिलांवर, मुलींवर अत्याचार होतात त्या प्रत्येकीला कायद्याची जाण असेलच असे नाही. अशा स्त्रियांना कायद्याचा योग्य उपयोग करून न्याय मिळवून देणो हेच माङो कार्य आहे. म्हणूनच आजचा हा पुरस्कार मला मिळालेला नसून न्याय मिळावण्यासाठी लढत असलेल्या प्रत्येक महिलेचा आहे, असे अॅडव्होकेट फ्लेविया अगAेस यांनी सांगितले.
कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार’ महिला हक्कांसाठी लढणा:या अगAेस यांना देण्यात आला.
या वेळी त्या बोलत होत्या. महिला संशोधन पुरस्कार संशोधक डॉ. सुमन सहाय यांना, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी यांना विशेष गौरव, आकांक्षा व आनंद देशपांडे यांना जिद्द, तर भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांना विशेष कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या विद्या बाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. आर. डी. लेले होते. साहस पुरस्काराच्या पहिल्या मानकरी रितू बिहाणी, सुरेश रानडे, जयश्री रानडे उपस्थित होत्या.
आज जगातील सर्वात मोठा संशोधक हा शेतकरी आहे. शेतक:यांना मान देऊन त्यांना वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिका,असा सल्ला सहाय यांनी दिला.
पुरस्कारामुळे कार्याचे सार्थक झाले, अशी भावना धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ व शेखर नानिवडेकर यांनी केले. विश्वराज नातू यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
4मनात कधीही नकारात्मक भावना येऊ द्यायची नाही आणि जिद्द सोडून हार मानायची नाही, अशी भावना ठेवून अपंगत्वावर आजवर मात केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
4माझं आजोळ रानडे असल्याने आज मला आजोळचा पुरस्कार मिळाला, असे सांगून कुलकर्णी यांनी भारूड सादर केले.
4गेल्या काही वर्षात पुरूषांपेक्षा महिलांचे पुरस्कार देण्याचे
व पुरस्कार मिळवण्याचे
प्रमाण वाढल्याचे सांगून सत्यनारायण यांनी आनंद व्यक्त केला.
आजच्या स्त्रीने फक्त न्यायाधीश, पोलीस, वकील असून चालणार नाही. त्यांच्या कामाला वैचारिक बैठक व संवेदनशीलतेची जोड असायला पाहिजे.- विद्या बाळ,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या