पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती
By Admin | Updated: March 20, 2015 01:07 IST2015-03-20T01:07:09+5:302015-03-20T01:07:09+5:30
निसर्गाने या जगात ज्या कार्यपूर्ततेसाठी पाठविले, तेच प्रामाणिकपणे करीत गेलो. ‘कामात’च राम पाहिला. आजवर अनेक पुरस्कार मिळाले,

पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती
पुणे : निसर्गाने या जगात ज्या कार्यपूर्ततेसाठी पाठविले, तेच प्रामाणिकपणे करीत गेलो. ‘कामात’च राम पाहिला. आजवर अनेक पुरस्कार मिळाले, पण एका चित्रकाराने चित्रकाराला दिलेले हे अॅवॉर्ड म्हणजे कामाला मिळालेली पावती आहे, अशी भावना ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाउंडेशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने मुरली लाहोटी यांना ज्येष्ठ उद्योजक आनंद चिंचणकर यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. १ लाख रुपये रोख आणि मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
याप्रसंगी रवींद्र साळवी, फाउंडेशनचे दिलीप डहाणूकर आणि गीता मामनिया उपस्थित होत्या.
पुण्यातला माणूस पुण्यातल्या माणसाला शाबासकी देतो, तो माणूस कुठेही राहू शकतो, अशी मार्मिक टिपण्णीही लाहोटी यांनी केली.
अध्यक्षीय भाषणात बोलताना उद्योजक आनंद चिंचणकर यांनी तरुण पिढीने कलाक्षेत्रात येण्याची इच्छा व्यक्त केली.
या वेळी दीपक थोपटे आणि प्रिया साकला यांनाही सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
चित्रकार आणि सामाजिक संस्था यांच्यामध्ये एकच साम्य आढळते, ते म्हणजे समाजाविषयीचे संवेदनशील मन. समाजातील दु:ख, वेदना मांडण्याचा प्रयत्न चित्रकार करीत असतो आणि जिथे संवेदनशीलता दिसते तिथेच संस्थाचे काम सुरू होते.
- गीता मामनिया