छत्रपती संभाजी महाराज सोसायटीला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:37+5:302021-03-04T04:17:37+5:30
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, वनराज्य मंत्री दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा सहकारी बँकचे चेअरमन रमेश थोरात या मान्यवराच्या ...

छत्रपती संभाजी महाराज सोसायटीला पुरस्कार
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, वनराज्य मंत्री दत्तामामा भरणे, पुणे जिल्हा सहकारी बँकचे चेअरमन रमेश थोरात या मान्यवराच्या हस्ते पुरस्कार प्रधान करण्यात आला. चेअरमन रमेश हिरामन शिवले, व्हा. चेअरमन सुदाम बळवंत शिवले, माजी चेअरमन राजाराम शिवले व संचालक मंडळ प्रमुख ग्रामस्था यांनी स्वीकारला. यावेळी ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.
चेअरमन रमेश शिवले म्हणाले सोसायटीच्या इतिहासात प्रथमच गावाला हा सन्मान मिळाला. शेतकरी सभासदाने वेळे कर्ज फेडण्यास दाखवलेले तप्तरता, संचालक मंडळाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले. संस्थेचे सभासद - ६२४ भागभांडवल - १२९९४९० कर्ज वाटप - १०१७३६१५ नफा १०५२२८४ असे आहे.
तुळापूर (ता. हवेली) छ. संभाजी सोसायटीला मिळालेला पुरस्कार स्वीकारता ग्रामस्थ व चेअरमन रमेश शिवले.