कोरेगाव भीमा: प्रजासत्ताकदिनानिमित्त शिरूर तालुक्यातील गोलेगाव येथील तरुणांनी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील शंभूराजांच्या समाधिस्थळाची स्वच्छता मोहीम राबवली.
शंभूराजांचे समाधिस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता.शिरूर) याठिकाणी कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळ व शिवशंभू प्रतिष्ठानचे सदस्य व नवविर्वाचित ग्रामपंचायत सदस्य दिलीप पडवळ, नीलेश बांदल, बबन मांढरे, सुरेश पडवळ , नामदेव पडवळ व कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीचे औचित्य साधत व शिव आणि स्वरा यांच्या वाढदिवसानिमित्त शंभूछत्रपतींच्या समाधिस्थळावर स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी ग्रामपंचायत वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले , अंकुश शिवले , रमाकांत शिवले ,नवनिर्वाचीत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे , हिरालाल तांबे , सचिन शिवले यांनी या तरुणांच्या उपक्रमाचे स्वागत केले. श्री धर्मवीर छत्रपती संभाजीमहाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे , कार्याध्यक्ष लक्ष्मण भंडारे , विश्वस्थ रमेश भंडलकर, शांताराम भंडारे आदी उपस्थित होते.
यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे नितीन चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवराय व शंभूछत्रपतींच्या रयतेच्या राज्याचे व राज्यकारभाराचे धडे तरुणांनी आत्मसात केले तर आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शिवशंभूचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून ते विचार तरुणांना प्रेरणादायी असल्याचे सांगत गोलगाव येथील कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळ व शिवशंभू प्रतिष्ठानचे तरुण सदस्य गडकोटांचे स्वागत करुन हॉलिडे साजरा करत असल्याने या तरुणांचा उपक्रम समाजाला आदर्श देणारा असल्याचे सांगितले.
२७ कोरेगाव भीमा
शंभूछत्रपतींच्या समाधिस्थळाची स्वच्छता मोहीम राबविताना कृष्णामाई क्रीडा व ग्रामविकास मंडळ व शिवशंभू प्रतिष्ठानचे सदस्य.