शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

असहिष्णू शक्तींना घालवा, देशभरातील ६०० रंगकर्मींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 01:40 IST

रंगकर्मींचे आवाहन : देशभरातील ६०० जणांचा सहभाग

पुणे : असहिष्णू आणि विभाजनवादी शक्तींना सत्तेतून घालवा आणि भारतीय संविधान, सहिष्णू आणि धर्मनिरपेक्ष वातावरणाचे रक्षणकरा, असे मतदारांना आवाहन करण्यासाठी देशभरातील ६00 रंगकर्मी एकवटले आहेत. यात पुण्यातील सात रंगकर्मींचाहीसमावेश आहे.

दोनच दिवसांपूर्वी चित्रपट-दिग्दर्शक-निर्माते तसेच साहित्यिक आणि विचारवंतांनी मतदारांना सुज्ञपणे मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या पाठोपाठ आता देशभरातील रंगकर्मी एकत्र आले आहेत. आपली भूमिका मांडत मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यात पुण्यातील आशुतोष पोतदार, अतुल पेठे, मनस्विनी लता रवींद्र, मकरंद साठे, मोहित टाकळकर, प्रमोद काळे आणि सतीश आळेकर या रंगकर्मींचाही समावेश आहे.

ब्रिटिश काळापासूनच भारतीय रंगकर्मींनी आपल्या कामांमधून भारताची विविधता वेळोवेळी प्रकट केली आहे. आम्ही स्वातंत्र्य लढ्याचा भाग म्हणून नाटके केली आहेत, आम्ही सामाजिक प्रश्नांना नाटकांतून हाताळले आहे. पितृसत्ता- ब्राह्मण्यवाद - जातीआधारित शोषण यांना कायमच आव्हान दिले आहे. धार्मिक फुटीरतावाद, कट्टरतावाद, संकुचितपणा, अविवेकीपणा आदी शक्तींच्या विरोधात उभे राहण्याची भारतीय रंगकर्मींची गौरवशाली परंपरा राहिली आहे. आज भारताची सर्वसमावेशक संकल्पनाच नेमकी धोक्यात आली आहे. आज आमचे नाच, गाणी, विनोद धोक्यात आले आहेत. आज आमचे प्रिय संविधानदेखील या तडाख्यातून सुटलेले नाही. प्रश्न विचारणे, खोटारडेपणाउघड करणे यांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवले जाते आहे.

विद्वेषाची बीजे आता थेट आमच्या खाण्यापिण्यांत, सण-समारंभांत, प्रार्थनांमध्ये मिसळली आहेत. ही धोक्याची घंटा आहे. हे थांबलेच पाहिजे, या भूमिकेतून देशभरातील रंगकर्मी अभिव्यक्त झाले आहेत. धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता आणि लोकशाही या मूल्यांचे जतन होणे आवश्यक आहे. मात्र ते होत आहे असे वाटत नाही. या महत्त्वाच्या बाबींचा विचार करूनच निवडणुकीत मतदान व्हावे.- मकरंद साठे, रंगकर्मीजे मतदान होईल ते धार्मिक किंवा जातीयतेवर होऊ नये. धार्मिक विद्वेष पसरवला जाऊ नये. लोकांनी त्याला बळी पडू नये. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सहिष्णूतेचे जतन केले पाहिजे. ज्या गोष्टी लोकशाहीच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत त्यांना वेळीच थांबवायला हवे. - अतुल पेठे, रंगकर्मी

टॅग्स :Puneपुणे