शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशाला विमान प्रशासनाचे दुर्लक्ष;एरोमॉल प्रशासनाच्या दबावामुळे ‘पीएमपी’ला जागा देण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 13:47 IST

पुणे : लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला थांब्यासाठी जागा द्यावी, अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक ...

पुणे : लोहगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसला थांब्यासाठी जागा द्यावी, अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्र्यांनी विमानतळ प्रशासनाला दिल्या आहेत. तरीही पीएमपी बसला नवीन टर्मिनलमध्ये जागा मिळालेली नाही. एरोमॉल प्रशासनाच्या दबावामुळे जागा देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.‘पीएमपी’कडून रामवाडी ते पुणे विमानतळदरम्यान बससेवा आहे; परंतु ही बस एरोमॉलच्या शेजारी नव्या टर्मिनलबाहेर थांबविली जाते. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत. नव्या टर्मिनलमध्ये पीएमपीला जागा मिळावी, यासाठी पीएमपी प्रशासनाकडून विमानतळ प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्रदेखील पीएमपी प्रशासनाने विमातळ प्रशासनाला दिले आहे; परंतु विमानतळ प्रशासनकडून अद्याप तरी जागा मिळालेली नाही. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांनी विमानतळ प्रशासनाला ‘पीएमपी’ची बस आतमध्ये सोडण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या; पण त्यानंतर एक महिना झाला तरी पीएमपीला आतमध्ये जागा मिळालेली नाही. त्यामुळे विमानतळ प्रशासन मंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. मात्र, सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या पीएमपीला जागा मिळावी, यासाठी प्रवाशांकडून मागणी होत आहे. प्रवाशांना दुहेरी त्रासपुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून प्रवासी रामवाडीपर्यंत मेट्रोतून रामवाडीपर्यंत येतात. पुढे पीएमपीकडून रामवाडी मेट्रो स्टेशन ते पुणे विमानतळ मार्गावर बससेवा सुरू केली आहे. ही बस एरोमॉलच्या शेजारी उभी करतात. नव्या टर्मिनलवरून येणाऱ्या प्रवाशांना लांब अंतर पडते. त्यामुळे ऑनलाइन कॅब बुक करतात. पीएमपी व मेट्रोतून ५० ते ६० रुपयांमध्ये होणाऱ्या प्रवासासाठी २०० ते ३०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक असा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.कॅब भरून, बस धावते रिकामीविमान, मेट्रो प्रवाशांना ये-जासाठी सोयीचे व्हावी, यासाठी पीएमपीकडून फिडर सेवा सुरू करण्यात आली; परंतु प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही, असे वारंवार सांगितले जाते. मुळात पीएमपीला सोयीचे ठिकाण मिळाले तर प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल; परंतु कोपऱ्यात बस उभी केल्यावर प्रवाशांना बस दिसत नाही. मात्र, दुसरीकडे खासगी कॅबला चांगला प्रतिसाद चांगला आहे. दैनंदिन पुणे विमानतळावरून ५०० च्या आसपास कॅब धावतात.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAirportविमानतळroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा