पक्ष्यांच्या किलबिलाटाने होतेय प्राधिकरण जागे

By Admin | Updated: May 16, 2015 04:19 IST2015-05-16T04:19:48+5:302015-05-16T04:19:48+5:30

घड्याळाचा गजर वाजला की, शहरातील नागरिकांना उठायची सवय आहे. आजही खेडेगावात कोंबडा आरवला की, गावातील माणसे जागी होतात. मात्र ,

Authority wake up by the bird's twitter | पक्ष्यांच्या किलबिलाटाने होतेय प्राधिकरण जागे

पक्ष्यांच्या किलबिलाटाने होतेय प्राधिकरण जागे

सुवर्णा नवले, पिंपरी
घड्याळाचा गजर वाजला की, शहरातील नागरिकांना उठायची सवय आहे. आजही खेडेगावात कोंबडा आरवला की, गावातील माणसे जागी होतात. मात्र , प्राधिकरण परिसरात आजही गेले कित्येक दिवसांपासून पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने नागरिकांच्या दिवसाची सुरुवात होत आहे. मात्र, खंत हीच आहे की, एवढ्या मोठ्या शहरात जागेचे सुनियोजन फक्त प्राधिकरण परिसरातच झाले आहे. यामुळेच दुर्मीळ पक्ष्यांचा किलबिलाट नागरिकांना सुखावह आहे व पक्ष्यांचे वास्तव्य टिकून राहिले आहे.
पिंगळा, खंड्या ( किंंगफि शर), सुगरण, कोकिळा, रंगीत चिमण्या, पोपट, पारवे, बुलबुल, साळुंकी, मधमाश्या, घुबड आदी पक्ष्यांचे वास्तव्य प्राधिकरणात आहे. प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २३ व २६मध्ये पक्ष्यांचा किलबिलाट पहाटे सुरू होतो. पहाटे ५ वाजल्यापासून ते ७ वाजेपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असतो. एकत्रित समूहाने पक्षी आढळत असल्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाजाचे संगीतच तयार झाले आहे. प्राधिकरणात वृक्षांचे प्रमाण वाढल्यामुळे पक्ष्यांचे वास्तव्य टिकून आहे. मात्र, या पक्ष्यांचे वास्तव्य दीर्घ काळ टिकू न राहावे, यासाठी प्राधिकरण व महापालिकेच्या वतीने पराकाष्ठेची गरज आहे.
प्राधिकरणात ५२ उद्याने आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये उद्यानाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान, संत तुकाराम, कबीर, दादा-दादी पार्क, गणेश तलाव, दुर्गादेवी उद्यान, रामबाग आदी विकसित भागांमध्ये उद्याने आहेत. या भागातही पक्ष्यांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात जाळीदार वृक्षांमध्ये व फु लांच्या झाडांवर पक्ष्यांनी आपला निवारा केला आहे. चेरीच्या अथवा तुतीच्या वृक्षांवर कोकिळा दिसत आहे. एकाच झाडावर २५ ते ३० घरटी दिसून येत आहेत. तसेच, कोकिळेचा सुमधुर आवाज प्राधिकरणवासीयांच्या कानी पडत आहे. चिमण्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
खडकवासलासारखा पक्षी संवर्धन पॅटर्न पिंपरी-चिंचवड शहरात राबविणे आवश्यक आहे. प्राधिकरण व महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समिती, पर्यावरण समितीने आजपर्यंत पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. एकूण ४० वर्षांच्या कालखंडात प्राधिकरणाच्या १९६६ सालच्या स्थापनेपासून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. नदीपात्रातील अनधिकृत अतिक्रमणे हटविणे, तसेच निळ्या रेषेचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे.

Web Title: Authority wake up by the bird's twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.