प्राधिकरण, एसएफएलसीएची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST2021-02-26T04:13:50+5:302021-02-26T04:13:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ...

Authority, forward of SFLCA | प्राधिकरण, एसएफएलसीएची आगेकूच

प्राधिकरण, एसएफएलसीएची आगेकूच

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक १२ व १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत प्राधिकरण जिमखाना, एसएफएलसीए या संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत ध्रुव विटेने (५५ धावा) केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर एसएफएलसीए संघाने तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा ७७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना एसएफएलसीए संघाने १५ षटकांत २ बाद १५९ धावा केल्या. यात ध्रुव विटेने ३९ चेंडूत ९ चौकरांच्या मदतीने ५५ धावा, अमानी नांदलने ३५ चेंडूत ३८ धावा व सुहानी काहंदळने १५ धावा करून डावाला आकार दिला.

प्रत्युत्तरात तिकोने क्रिकेट गुरुकुल संघ १५ षटकांत ५ बाद ८२ धावाच करू शकला. यात प्रचित भळगटने एकाबाजूने लढताना ४८ धावा केल्या. एसएफएलसीएकडून तन्वी पाटील २-७, सुहानी काहंदळ १-९ यांनी सुरेख गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात

हर्ष ओसवालच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्राधिकरण जिमखाना संघाने दिवेकर क्रिकेट अकादमी संघाचा १० धावांनी पराभव केला.

Web Title: Authority, forward of SFLCA