शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकाऱ्यांचाच ‘खो’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 19:01 IST

राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे.

पुणे : शिक्षक भरती प्रक्रियेला विभागातील अधिकाऱ्यांकडूनच खो दिला जात असल्याचे समोर आहे. या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत खुद्द शिक्षण आयुक्तांनीच अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया वेळेत पुर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा आढावा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडून घेतला जात आहे. त्यानुसार दि. २९ जानेवारी रोजी या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोळंकी हे अधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते. पण या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी ही आढावा बैठक पुढे ढकलली आहे. आता व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी ते दि. १ व २ फेब्रुवारी रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व महापालिकांचे प्रशासन अधिकारी मनपा यांची बैठक पुण्यात घेणार आहेत. तत्पुर्वी सोळंकी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. भरती प्रक्रियेचे काम वेळेत पुर्ण होणे अपेक्षित असताना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सर्व संबंधितांना याबाबत वेळोवेळी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. पण योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही. गूगल फॉर्मवर नियमितपणे माहिती अद्यायावत होत नाही. भरलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया निश्चित कालमयार्देत करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. तसेच बैठकीसाठी कोणत्याही प्रतिनिधीला न पाठविता स्वत: उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सुचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेTeacherशिक्षकState Governmentराज्य सरकार