प्राधिकरणाने आणले पुन्हा वृक्षतोडीचे प्रकरण
By Admin | Updated: February 25, 2015 22:35 IST2015-02-25T22:35:44+5:302015-02-25T22:35:44+5:30
ठाणे महापालिकेने सादर केलेल्या २०१५-१६ च्या आणि वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अंदाजपत्रकात दोन वर्षांत शहरात पाच लाख वृक्ष लागवडीचा दावा केला

प्राधिकरणाने आणले पुन्हा वृक्षतोडीचे प्रकरण
ठाणे : ठाणे महापालिकेने सादर केलेल्या २०१५-१६ च्या आणि वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अंदाजपत्रकात दोन वर्षांत शहरात पाच लाख वृक्ष लागवडीचा दावा केला आहे. परंतु, ही लागवड करण्याआधीच केवळ बिल्डरांच्या हितासाठी पुन्हा वृक्षतोडीचे सुमारे १२ प्रस्ताव पुढे आणले आहेत. यामध्ये सुमारे १५० वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. परंतु, वृक्ष प्राधिकरण समितीला अंधारात ठेवून हे प्रकरण पुढे आणल्याने आता पुन्हा वादंग निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या वृक्षतोडीबाबतीत वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून सूचना व हरकती मागविल्या आहेत. या सूचना हरकतीनंतर यासंदर्भातील प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समितीच्या मुद्यावरून पालिकेत गोंधळ सुरू होता. त्यातून आता मार्ग काढून वृक्ष प्राधिकरण समिती गठीत झाली आहे. परंतु, या प्रकरणाबाबत एकाही सदस्याला याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. (प्रतिनिधी)