शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिकाचाच संमेलनाला विसर! शरणकुमार लिंबाळे यांना निमंत्रणच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 11:28 IST

‘सनातन’ या कादंबरीसाठी शरणकुमार लिंबाळे यांचा प्रतिष्ठेच्या सरस्वती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल साहित्य संमेलनाने घेतलेली दिसत नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला होता.

प्रज्ञा केळकर-सिंग -

पुणे: नाशिक येथे होत असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सत्कारमूर्ती, सहभागी साहित्यिक आणि कवी यांना निमंत्रण पोहोचले. मात्र, ‘सरस्वती सन्मान’प्राप्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना निमंत्रित करण्याचे साधे सौजन्यही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संयोजक संस्थेने दाखविलेले नाही. प्रस्थापितांच्या संमेलनात ठरावीक साहित्यिकांची उपेक्षा का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात आहे. ‘सनातन’ या कादंबरीसाठी शरणकुमार लिंबाळे यांचा प्रतिष्ठेच्या सरस्वती सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. मात्र, त्याची दखल साहित्य संमेलनाने घेतलेली दिसत नाही. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या पत्नी अनुराधा पाटील यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला होता. आता लिंबाळे यांचा सन्मान महामंडळ करणार का, याविषयी साहित्यिकांना उत्सुकता आहे.  लिंबाळे म्हणाले, ‘मी नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २५ वर्षे होतो. याआधी नाशिकला संमेलन झाले, त्याही वेळी मला निमंत्रण नव्हते. यंदाही निमंत्रण नाही. संमेलन विशिष्ट गट, कंपूपुरते मर्यादित राहिले आहे. संमेलन सर्वसमावेशक झाले पाहिजे.  

विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार या दिग्गजांना यापूर्वी सरस्वती सन्मान मिळाला होता, तेव्हा साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला नव्हता. त्यामुळे आजपर्यंत असा प्रश्न उपस्थित झाला नाही. उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनात अनुराधा पाटील यांच्या सत्काराला साहित्य महामंडळाने नकार दिला होता. मात्र, साहित्यिका मराठवाड्यातील असल्याने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय मंडळाने घेतला होता. सरस्वती सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच संमेलनाच्या निमंत्रण पत्रिका छापून झाल्या आहेत.    - कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

ज्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे, भाषा आणि साहित्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, त्यांनाही संमेलनात स्थान मिळाले पाहिजे. लोकांच्या पैशातून केवळ जवळच्या व्यक्तींचा सन्मान करून, त्यांना उपकृत करणे योग्य नाही. सरस्वती सन्मान नाकारणाऱ्यांचा उदो उदो होतो आणि पुरस्कार स्वीकारणाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.       - शरणकुमार लिंबाळे, साहित्यिक. 

निमंत्रणपत्रिकेचा नाही पत्ता! अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या आयोजनाबाबत काही विशिष्ट नियम, परंपरा आणि संकेत घालून दिले आहेत. त्यानुसार संमेलनाचे स्थळ, कालावधी, संमेलनाध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष आणि अन्य सर्व बाबी निश्चित झाल्यानंतर त्या संमेलनाची निमंत्रणपत्रिका तयार केली जाते. ती निमंत्रणपत्रिका संमेलनाचे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष, निमंत्रक स्वतः संमेलनात सहभागी होणाऱ्या मान्यवरांना आग्रहपूर्वक देतात. त्यांनी ते स्वीकारल्यानंतरच त्या मान्यवरांचे येणे निश्चित मानून त्याबाबतची घोषणा केली जाते. मात्र, नाशिकच्या साहित्य संमेलनात सर्वच रूढ परंपरांना फाटा देत भूमिपूजनाचा सोहळादेखील उरकून घेण्यात आला.  साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सर्व नियम, परंपरांची आयोजकांना माहिती दिलेली असते. ते पाळत नसतील तर आम्ही तरी काय करणार? निमंत्रणपत्रिकेसह अन्य सर्व बाबींबाबत स्वागताध्यक्ष आणि निमंत्रकांशीच बोलून बघा.     - दादा गोरे, उपाध्यक्ष, अखिल     भारतीय मराठी साहित्य महामंडळ    

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिक