आॅटोरिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करा
By Admin | Updated: July 28, 2015 00:44 IST2015-07-28T00:44:15+5:302015-07-28T00:44:15+5:30
सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण केलेले नाही.

आॅटोरिक्षा मीटरचे प्रमाणीकरण करा
पुणे : सुधारित भाडेवाढीनुसार रिक्षाचालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही निम्म्यापेक्षा जास्त रिक्षाचालकांनी प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी १५ आॅगस्टपूर्वी प्रमाणीकरण करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने २८ मे रोजी झालेल्या बैठकीत रिक्षांच्या भाडेदरवाढीस मान्यता दिली आहे. नवीन भाडेदर १ जुलैपासून लागू
करण्यात आले आहेत. त्यासाठी मीटरचे
प्रमाणीकरण करण्यासाठी दि. १५ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रमाणीकरण हे वैधमापन विभागाकडून करण्यात येत आहे. २२ जुलैपर्यंत सुमारे ४५ हजार रिक्षांपैकी १६ हजार ८८३ रिक्षांचे प्रमाणीकरण झालेले आहे. इतर रिक्षांचे प्रमाणीकरण १५ आॅगस्टपर्यंत करणे बंधनकारक आहे, असे पाटील
यांनी सांगितले.
आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत रिक्षांची तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांनी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत व तपासणी अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. तसेच प्रवाशांची गैरसोय टाळावी, असेही आवाहन पाटील
यांनी केले. (प्रतिनिधी)