शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

औंध जकात नाक्याची जागा पीएमपीसाठी : स्थायी समितीने दिली मान्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 22:30 IST

पाच वर्षांचा भाडेकरार, दरमहा आकारणार ५ लाख ७६ हजार ४७० रुपये

ठळक मुद्देशहरात पीएमपी बसची संख्या वाढत असतानाच या बसेस लावायच्या कुठे असा मोठा प्रश्नजकात बंद झाल्यापासून ही जागा मोकळी आणि वापराविना पडून

पुणे : शहरात पीएमपी बसची संख्या वाढत असतानाच या बसेस लावायच्या कुठे असा मोठा प्रश्न आहे. बहुतांश गाड्या या रस्त्यांवर रात्रीच्यावेळी उभ्या केल्या जातात. त्यातच नविन इलेक्ट्रिक बसेसच्या चार्जिंग स्टेशनचाही प्रश्न आहेच. त्यामुळे पीएमपीने यावर मार्ग काढण्याकरिता पालिकेकडे औंध येथील जकात नाक्याची जागा पाच वर्षांकरिता भाडेकराराने मागितली आहे. त्याला स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी दिली. एकूण सात हजार २०३ चौरस मीटरची जागा दरमहा ५ लाख ७६ हजार ४७० रुपये दराने देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. औंध येथे पालिकेची ही जागा आहे. या जागेवर पुर्वी जकात नाका होता. जकात बंद झाल्यापासून ही जागा मोकळी आणि वापराविना पडून आहे. या जागेचा वापर पीएमपीएमएलसाठी होऊ शकतो; असा विचार करुन संचालक मंडळाने ही जागा देण्याची मागणी महापालिकेकडे केली. त्यावर पालिकेने या जागेचे दरमहा ५लाख ७६ हजार ४७० रुपये एवढे मुल्यांकन काढले. तसेच ही जागा पीएमपीएमएलसाठी पाच वर्षांसाठी देण्यासंदर्भात भाडे करार करण्यासाठी पालिका प्रशासनाने सहा महिन्याच्या भाड्याइतकी अनामत रक्कम (३४ लाख ५८ हजार ८५०) आणि एका महिन्याचे आगाऊ भाडे भरण्यास कळविले होते. परंतू, सध्या पीएमपीची आर्थिक स्थिती ढासळलेली असून ४० लाख रुपये देणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिका पालिकेला देत असलेल्या संचलन तुटीच्या अनुदानातून ही ४० लाख रुपयांची रक्कम वजा करण्यात यावी असे पीएमपीएमएलला कळविण्यात आले. त्यावर आयुक्त सौरभ राव यांनी ही जागा पीएमपीएलला पाच वर्षांसाठी पाच लाख  ७६ हजार ४७० रुपये  भाडे कराराने देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर मंजुरीसाठी ठेवला. या प्रस्तावाला  स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती हेमंत रासने यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका