शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अबब! पालखी मार्गावर १७८ खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:35 IST

रस्त्याची चाळण : पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी चालकांना त्रास

देहूरोड : देहूगाव-देहूरोड पालखी मार्गावर देहूरोड लष्करी हद्दीत अशोकनगर-चिंचोलीपासून ते झेंडेमळादरम्यानच्या रस्त्यावर पडलेल्या लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अशोकनगर (चिंचोली) ते झेंडेमळादरम्यानच्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर १७८ धोकादायक खड्डे पडले असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याच भागातील कॅन्टोन्मेंटचे बहुतांशी पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मोठी गैरसोय होत असून, वाहने आदळण्याचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्याची दुरुस्ती नक्की कधी आणि कोण करणार, असा सवाल स्थानिकांसह, तळवडे येथील आयटी पार्कमध्ये जाणारे त्रस्त अभियंते करीत आहेत.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील देहूरोड ते झेंडेमळादरम्यानचा रस्ता केंद्रीय आॅर्डनन्स डेपोच्या प्रवेशद्वारापर्यंत (सीओडी) देहूरोड लष्करी अभियांत्रिकी (एमईएस) या विभागाच्या ताब्यात असून, त्यांच्यामार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येते. तसेच झेंडेमळा (कॅन्टोन्मेंट हद्द) ते केंद्रीय आॅर्डनन्स डेपो प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याची देखभाल दुरुस्ती गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येते. जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यापासून या दोन्ही भागातील रस्त्यावर लहान मोठे १७८ खड्डे पडले असून, अडीच महिन्याच्या काळात एकही खड्डा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. या रस्त्यावरून तळवडे आयटी पार्ककडे ये-जा करणारी अभियंत्यांसह अधिकाऱ्यांच्या चारचाकी खासगी मोटारी, चाकण एमआयडीसीकडे ये-जा करणारी वाहने तसेच देहूगाव पंचक्रोशीतील पंधरा वीस गावांतील वाहने व देहूगाव येथे संत तुकाराममहाराजांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून येणाºया भाविकांच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पालखी सोहळ्याच्या वेळी रस्त्याची किरकोळ डागडुजी करण्यात येते. यावर्षी तर पालखी सोहळा वारीहून परत येऊन सोळा दिवस उलटले असतानाही या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी येथून नियमित ये-जा करणारे वाहनचालक तसेच भाविक त्रस्त झाले आहेत.अशोकनगर-चिंचोली भागात सर्वाधिक खड्डे पडले असून, या रस्त्यावर वाहनांची सर्वाधिक वर्दळ असल्याने रस्त्यावरील खड्डे चुकविणे अनेकदा शक्य होत नाही. त्यातच चिंचोली ते आर्मी स्कूलदरम्यानच्या एक किलोमीटर भागात फक्त दोनच पथदिवे लागत असून, इतर दिवे बंद असल्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत माहिती घेतली असता एलईडी दिवे बसविण्यात येणार असल्याने जुने दिवे दुरुस्ती करण्यात आले नसल्याचे समजते. मात्र सध्या तरी रस्त्यावर अंधार असल्याने वाहनचालकांना नाईलाजास्तव खड्ड्यांत वाहने घालावी लागत आहेत. त्यामुळे वाहने आदळून नुकसान होत असून, खड्ड्यांची लांबी रुंदी दिवसागणिक वाढत चालली आहे.

टॅग्स :Puneपुणे