स्थायी समिती सभापतिपदी अतुल शितोळे बिनविरोध
By Admin | Updated: March 8, 2015 01:18 IST2015-03-08T01:18:05+5:302015-03-08T01:18:05+5:30
एकमेव अर्ज दाखल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल शितोळे यांची स्थायी समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली.

स्थायी समिती सभापतिपदी अतुल शितोळे बिनविरोध
पिंपरी : एकमेव अर्ज दाखल असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल शितोळे यांची स्थायी समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कांतिलाल उमाप यांनी शितोळे यांची निवड झाल्याचे घोषित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीतील १२ सदस्य सभापतिपदासाठी इच्छुक होते. स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा १ मार्चला कार्यकाल संपुष्टात आला. नव्याने आठ सदस्यांची निवड झाली. त्यानंतर पुढील वर्षासाठी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे बाराही स्थायी समिती सदस्य इच्छुक होते. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अतुल शितोळे यांनाच अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अतुल शितोळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर आझम पानसरे, तात्या कदम, योगेश बहल, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, सविता साळुंखे, अनिता तापकीर, विनायक गायकवाड, कैलास थोपटे, प्रसाद शेट्टी, डब्बू आसवानी, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, राजेंद्र जगताप, संजय काटे, माजी नगरसेवक नाना काटे यांनी शितोळे यांना शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)