कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या आयुक्तांच्या बजेटकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:50+5:302021-02-05T05:17:50+5:30

पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक संकटात गेलेले गेली दहा महिने, विकास कामांना बसलेली खीळ व तुटपुंजे उत्पन्नाचे मार्ग, या ...

Attention to the budget of the Commissioner presented on the background of Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या आयुक्तांच्या बजेटकडे लक्ष

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या आयुक्तांच्या बजेटकडे लक्ष

पुणे : कोरोना आपत्तीमुळे आर्थिक संकटात गेलेले गेली दहा महिने, विकास कामांना बसलेली खीळ व तुटपुंजे उत्पन्नाचे मार्ग, या सर्व पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आज ( २९ जाने.) सादर करणार आहे.

कोरोना आपत्तीतून आता कुठे अर्थ व्यवस्था सावरत असताना, रखडलेली विकास कामे करताना कोणती कर वाढ मिळणार की, सवलत देणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत महापालिकेस केवळ ३ हजार २८५ कोटींचा महसूल मिळाला असून, आतापर्यंत त्यातील तब्बल २ हजार ९९३ कोटी रुपये खर्चही झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत जेमतेम २५० ते ३०० कोटी रुपयेच शिल्लक आहेत. या शिलकीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार उद्या आगामी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

-----

Web Title: Attention to the budget of the Commissioner presented on the background of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.