शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न

By Admin | Updated: January 1, 2015 01:01 IST2015-01-01T01:01:30+5:302015-01-01T01:01:30+5:30

येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे.

Attempts to increase the punishment | शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न

शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न

पुणे : येत्या वर्षात पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसंवाद वाढवण्यात येणार आहे. नागरिकांना पोलिसांच्या व्यासपीठावर बोलावून त्यांच्या पोलीस दलाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेऊन त्यानुसार त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले. यासोबतच गुन्ह्यांमधील शिक्षेचे प्रमाण वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती माथूर यांनी दिली.
गेल्या ७ महिन्यांमध्ये शहर पोलिसांनी तब्बल २२५ विविध कार्यक्रम घेतले आहेत. पोलीस दलाचा चेहरा अधिक समाजाभिमुख करण्याचा त्यातून प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात आल्या आहेत.
येत्या वर्षामध्ये शहर पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. अधिकाधिक लोकसंवादामधून समोर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांचा सहभागदेखील आवश्यक असल्याचे माथूर म्हणाले. सोनसाखळीचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ दिसत असली, तरीदेखील गुन्हे उघडकीस आणण्यामध्येही पुणे शहर पोलिसांचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. चोरट्यांकडून जप्त केलेला ऐवज सार्वजनिक कार्यक्रम घेऊन फिर्यादींना परत देण्यात आला. असा उपक्रम राज्यात कुठेही राबविण्यात आलेला नसल्याचे उपायुक्त (गुन्हे) जयंत नाईकनवरे यांनी सांगितले.

लोकसंख्यावाढीचा परिणाम गुन्हेगारीवरही
च्शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत चालली आहे, त्या प्रमाणात गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत जाणार. जे गुन्हे घडतात ते दाखल करून घेतले जातात. गुन्हे दाखल करून घेतले जात असल्यामुळे संख्या जास्त वाटते. परंतु, गुन्हेच दाखल न करता जर ‘क्राईम रेट’ खाली आणायचा असेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवालही आयुक्तांनी केला.
च्अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील काही गावे शहराला जोडली गेली आहेत. या गावांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळ मात्र पोलिसांना मिळालेले नाही. जर लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले नाहीत, तर ‘व्यवस्थे’मध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले याचा अर्थ गुन्हेगारी वाढली अगर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले म्हणजे गुन्हेगारी कमी झाली, असा होत नाही, असेही ते म्हणाले.

च्शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण जाणवत आहे. वाहतूककोंडी आणि वाहतुकीच्या समस्या सोडवायच्या असल्यास केवळ पोलिसांवर विसंबून राून चालणार नाही. त्यासाठी नागरिकांच्या सहभागाचीही आवश्यक आहे.
च्येत्या काळात सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात सबळ साक्षीपुरावे सादर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी सांगितले.

Web Title: Attempts to increase the punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.