शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न  : चेतन तुपे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 20:38 IST

ज्यांना पक्षाची विचारधारा माहिती नाही, ज्यांना समाजातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करायची आहे त्यांनी हे उद्योग केले आहेत. .

ठळक मुद्देपक्ष फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मानतो

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हा सर्वधर्मसमभाव व फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा माननारा पक्ष आहे. हा केवळ मराठ्यांचा पक्ष आहे अशा स्वरुपाचे पत्र पाठवणे हा पक्षाला बदनाम करण्याचा डाव आहे. यातील आरोप निराधार व खोडसाळपणाचे असल्याचे स्पष्टीकरण शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले. पक्षाची भूमिका नेहमीच सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची राहिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्वच नेते व पदाधिकारी जातीपाती पलिकडे जाऊन राजकारणाकडे पाहतात. दलित, ओबीसी, मुस्लिम व अल्पसंख्यांकांच्या हितासाठी नेहमीच त्यांना पक्षाने प्रतिनिधीत्व दिले आहे. शहरामध्ये पालिकेत एकच स्विकृत नगरसेवकपद वाट्याला आले होते. हे पद सुभाष जगताप यांना दिले. तर राज्याच्या महिलाध्यक्षा रुपाली चाकणकर ओबीसी आहेत. सांस्कृतिक कला सेलचे बाबा पाटील ओबीसी आहेत. अमोल कोल्हे खासदार झाले ते ओबीसी आहेत. सत्ता असताना पालिकेच्या महापौर व स्थायी समिती अध्यक्षपदी ओबीसी महिलेला संधी दिली होती. यासोबतच पक्षाचे २१ सेल आहेत. या सेलमध्ये ८ सेलचे अध्यक्ष मराठा व १३ सेलचे अध्यक्ष मराठेतर आहेत. शहराच्या मुख्य संघटनेतील १३० पदांपैकी ७७ पदे ही मराठेतर व्यक्तींना दिलेली आहेत. हे प्रमाण ५९ टक्के असल्याचे तुपे म्हणाले. पक्ष फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा मानतो. ज्यांना पक्षाची विचारधारा माहिती नाही, ज्यांना समाजातील जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करायची आहे त्यांनी हे उद्योग केले आहेत. अद्यापही शरद पवार अजित पवार, जयंत पाटील, अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्यापासून ते माझ्यापर्यंत कोणालाही या पत्राची प्रत मिळालेली नाही. पक्षामध्ये लोकशाही असून सर्वांच्या मतांना किंमत आहे. केवळ सोशल मीडियामधून फिरत असलेल्या या पत्राला कोणतेही महत्व देण्याची आवश्यकता नसल्याचे तुपे म्हणाले. ====अजित पवार यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून मराठेतर समाजातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांना अत्यंत महत्वाची पदे दिलेली आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून मराठा समाज अधिक सक्रिय असल्याने त्यांना संधी मिळते यात वावगे नाही. पक्षाच्या विविध सेलच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षपदीही अन्य समाजातील कार्यकर्ते होते. २०१४ साली पर्वती विधानसभा खुल्या गटासाठी असतानाही दलित समाजातील उमेदवाराला संधी दिली. राष्ट्रवादीविरोधातील हे पत्र महत्वहीन असून पक्षाला बदनाम करण्यासाठी असल्याचे पत्र दादा ग्रुपच्यावतीने जितेंद्र टकले, शैलेश बडदे, उद्धव बडदे, गणेश माथवड, संदीप तौर, बाळासाहेब अटल, गोविंद थरकुडे आदींनी प्रसिध्दीस दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार