दुकानदाराने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST2021-06-01T04:08:39+5:302021-06-01T04:08:39+5:30

पुणे : दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षांच्या युवतीने घरी आल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामागील कारणाचा शोध घेतला असताना ...

Attempted suicide of a minor girl by a shopkeeper | दुकानदाराने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

दुकानदाराने विनयभंग केल्याने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी गेलेल्या १९ वर्षांच्या युवतीने घरी आल्यावर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामागील कारणाचा शोध घेतला असताना ६१ वर्षांच्या दुकानदाराने तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.

वारजे माळवाडी पोलिसांनी दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी या युवतीच्या आईने वारजे माळवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. २८ मे रोजी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षांची ही युवती आपल्या घराजवळील एका दुकानात रात्री आईस्क्रिम घेण्यासाठी गेली. त्यावेळी दुकान मालकाने आईस्क्रिम देण्याचा बहाणा करून तिला आपल्या जवळ ओढले व तिच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. या प्रकारानंतर ती घरी आली. तेव्हा तिच्या आई-वडिलांनी इतक्या रात्री कोठे गेली होती, याची चौकशी केली. तेव्हा तिने सांगण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तिने घरातील कपडे धुण्याचा डिटर्जंट पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आई-वडिलांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तेव्हा तिने दुकानदाराने केलेल्या विनयभंगाची माहिती दिली.

Web Title: Attempted suicide of a minor girl by a shopkeeper