पोलीस अधीक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST2021-02-15T04:11:24+5:302021-02-15T04:11:24+5:30

पुणे : खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करून एकाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात ...

Attempted suicide by drinking poison in Superintendent of Police office | पोलीस अधीक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस अधीक्षक कार्यालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करून एकाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

नवनाळ बन्सी थोरात (रा. रांजनी, ता. आंबेगाव) असे त्यांचे नाव आहे. नवनाथ थोरात असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार मारुती शिंदे यांनी चतृःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात नवनाथ थोरात हे शनिवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्याने माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपी करीत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या ठिकाणी खळबळ उडाली. कर्मचा-यांनी तत्काळ नवनाथला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार तपास करीत आहेत.

Web Title: Attempted suicide by drinking poison in Superintendent of Police office