शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील धक्कादायक प्रकार; २ महिन्यापासून पगार दिला नसल्याने महापालिकेसमोर कंत्राटी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 20:45 IST

वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करत असून गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही, तसेच पगारात कपात केली जाते, सुटी दिली जात नाही, या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात बीव्हीजी इंडीया या ठेकेदार कंपनीमार्फत कंत्राटी तत्वावर काम  करणाऱ्या डॉक्टरने दोन महिन्यापासून पगार होत नसल्याने अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी तीनच्या सुमारास घडली.

महेंद्र अच्युतराव चाटे (वय ३१, रा. मोशी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. चाटे हे बीव्हीजी इंडीया या ठेकदार कंपनीमार्फत वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करतात. गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही. तसेच पगारात कपात केली जाते. सुटी दिली जात नाही. यामुळे डॉ. चाटे त्रस्त झाले होते. या नैराश्यातून ते शुक्रवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आले आणि अचानक अंगावर डिझेल ओतून घेण्यास सुरूवात केली. हा प्रकार निदर्शनास येताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत डॉ. चाटे यांना रोखले. त्यांच्या हातातील लायटर ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांची समजूत घातली.

सुरक्षा अधिकारी गोफणे यांनी त्वरीत हा प्रकार पिंपरी पोलीसांना कळविला. पिंपरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन डॉ. चाटे यांना ताब्यात घेतले. पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसMuncipal Corporationनगर पालिकाdocterडॉक्टरPoliceपोलिस