कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST2021-08-18T04:14:13+5:302021-08-18T04:14:13+5:30
पुणे : पूर्ववैमनस्यातून काळेपडळ येथील भाई म्हणवून घेणाऱ्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी ...

कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
पुणे : पूर्ववैमनस्यातून काळेपडळ येथील भाई म्हणवून घेणाऱ्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
योगेश कुंदर (वय २५), मुन्ना बलाडे (वय १९), अनिकेत कुंदर (वय २०) आणि चेतन कांबळे (वय २०, सर्व रा. नाईकनवरे बिल्डिंग, काळेपडळ, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी सौरभ दत्तात्रय चौतमहल (वय २०, रा. नाईकनवरे सोसायटी, काळेपडळ, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी व त्याचे मित्र लखन कासले व नामदेव सोडगे हे समृद्धी रेस्टॉरंटसमोर रविवारी दुपारी थांबले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी सौरभ याला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून कोयत्याने फिर्यादीच्या हातावर व डोक्यात वार केले. तसेच इतरांनी दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण करताना कुंदर याने ‘मी या गल्लीतला भाई आहे,’ असे हत्यारासह ओरडून परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.