दुश्मनाबरोबर फिरण्याच्या कारणावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:57+5:302021-08-23T04:14:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सौरभ शिंदेबरोबर का फिरतो, असे विचारून रिक्षातून आलेल्या चौघांनी तरुणावर काेयत्याने वार करुन दोन ...

दुश्मनाबरोबर फिरण्याच्या कारणावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सौरभ शिंदेबरोबर का फिरतो, असे विचारून रिक्षातून आलेल्या चौघांनी तरुणावर काेयत्याने वार करुन दोन टेम्पोची तोडफोड करण्याचा प्रकार अप्पर बिबवेवाडीत घडला.
याप्रकरणी मयूर जगताप (वय २२, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मयूर जगताप हे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता व्हीआयटी कॉलेजजवळून चालत घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या तोंडओळखीचा एक जण व त्याचे तीन साथीदारांसह रिक्षातून आला. त्याला शिवीगाळ करून तू सौरभ शिंदेसोबत का फिरतो, तुला माज आलाय का, तुझा खेळ आता संपवितो, असे म्हणून हातातील कोयत्याने फिर्यादीला जीव मारण्याच्या उद्देशाने वार केला. फिर्यादी याने तो चुकवला व जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना या टोळक्याने गल्लीत उभे असलेल्या दोन टेम्पोवर दगड मारुन त्यांचे नुकसान करीत परिसरात दहशत पसरवली.