घटस्फोटीत पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST2021-04-15T04:11:25+5:302021-04-15T04:11:25+5:30

गोपाळ अशोक खारवा ( रा.चोरबाजार,दोन टाकी,मज्जीद बंदर,मुंबई )असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी ...

Attempted murder of wife by divorced husband | घटस्फोटीत पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

घटस्फोटीत पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

गोपाळ अशोक खारवा ( रा.चोरबाजार,दोन टाकी,मज्जीद बंदर,मुंबई )असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी दिलेल्या माहिती नुसार, या गुन्ह्यातील फिर्यादी काजल पप्पू सोवलीया (वय २७, रा. खंडोबामाळ, चाकण, ता. खेड) यांचे गोपाळ खारवा यांच्याशी पहिले लग्न झाले होते. त्यांना गोपाळ याच्यापासून तीन अपत्य झाले आहेत. मागील आठ महिन्यांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर काजल यांना पप्पू मंजी सोवलीया यांच्यासोबत विवाह केला. त्यामुळे काजल या पप्पू सोवलीया यांच्यासोबत चाकण येथील खंडोबामाळ येथे राहत आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास काजल घरी एकट्या असताना, त्यांचा घटस्फोटीत पती गोपाळने तेथे आला. व त्याने तू मला आणि मुलांना सोडून दुसरे लग्न का केले? परत माझ्यासोबत राहण्यास चल असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. काजल यांना त्याने खाली पाडून कमरेच्या पट्ट्याने बेशुद्ध पडेपर्यंत बेदम मारहाण केली त्यानंत पट्ट्याने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध झाल्यामुळे निपचीत पडल्यावर गोपाळ पळून गेला. त्यानंतर सासू सासऱ्यांनी काजल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काजल यांनी गोपाळ खरवा याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गोपाळ याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, राजकुमार रेंगडे, संदीप सोनवणे,अशोक दिवटे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attempted murder of wife by divorced husband