महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST2021-05-23T04:11:11+5:302021-05-23T04:11:11+5:30

पुणे : मुलाचा किरकोळ अपघाताचा राग मनात धरून दोघांनी महिलांला मारहाण करून, ती खाली पडली असताना तिच्या गळ्यावर पाय ...

Attempted murder by stepping on woman's neck | महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न

महिलेच्या गळ्यावर पाय देऊन खुनाचा प्रयत्न

पुणे : मुलाचा किरकोळ अपघाताचा राग मनात धरून दोघांनी महिलांला मारहाण करून, ती खाली पडली असताना तिच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पिता-पुत्रांना अटक केली आहे.

असिफ अब्दुल रेहमान शिकीलकर (वय ५२, रा. मेमनवाडा, संतोषनगर, कात्रज) आणि अमिन असिफ शिकीलकर (वय २१, रा. संतोषनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना संतोषनगर येथील दामगुडे बिल्डिंगमध्ये २० मे रोजी रात्री दहा वाजता घडली. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांशेजारी राहायला आहेत. फिर्यादी व आरोपी यांचा मुलाचा किरकोळ अपघात झाला होता. त्याचा राग मनात धरून आरोपी हे शिवीगाळ करून बघून घेतो, अशी धमकी देत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे पती त्यांना समजाविण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्या पोटावर, तसेच गुप्तांगावर लाथा मारून त्यांचा विनयभंग केला. त्याखाली पडल्या असताना त्यांच्या गळ्यावर पाय देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Attempted murder by stepping on woman's neck