कोंढव्यात तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:16 IST2021-08-13T04:16:13+5:302021-08-13T04:16:13+5:30

पुणे : जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केला. कार्तिक जाधव (वय २९) असे यात ...

Attempted murder by stabbing a young man in Kondhwa | कोंढव्यात तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

कोंढव्यात तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

पुणे : जुन्या वादातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार करून खुनाचा प्रयत्न केला.

कार्तिक जाधव (वय २९) असे यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढव्यातील येवलेवाडी येथील अनुकूलनगर येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

कार्तिक जाधव व कोंढव्यातील काही जणांमध्ये पूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग धरून आरोपी संधी शोधत होते. कार्तिक हा सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनुकूलनगर येथे आला होता. ही संधी साधून ४ ते ५ जणांनी त्याच्यावर काेयत्याने वार केले. कार्तिक रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर ते पळून गेले. याची माहिती मिळाल्यावर कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी कार्तिकला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

कार्तिक याला ज्या ठिकाणी मारले. त्या ठिकाणी हा प्रकार पाहणारे कोणी नव्हते. तसेच आजूबाजूला सीसीटीव्हीही पोलिसांना आढळून आले नाही. कोंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attempted murder by stabbing a young man in Kondhwa