घटस्फोटीत पत्नीवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:14 IST2021-08-29T04:14:07+5:302021-08-29T04:14:07+5:30

पुणे : दिलेले पैसे परत करण्यावरून पतीने घटस्फोटीत पत्नीवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सनी ...

Attempted murder by stabbing divorced wife | घटस्फोटीत पत्नीवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न

घटस्फोटीत पत्नीवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न

पुणे : दिलेले पैसे परत करण्यावरून पतीने घटस्फोटीत पत्नीवर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी सनी बाळू गायकवाड (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) याला अटक केली आहे.

याप्रकरणी वडगाव शेरी येथील एका ३० वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव शेरी येथील गवळीवाडा येथे शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. फिर्यादी महिलेचा गायकवाडबरोबर २०११ मध्ये विवाह झाला होता. ते २०१७ मध्ये विभक्त झाले होते. त्यांचा २०१९ मध्ये घटस्फोट झाला. या कालावधीत फिर्यादी महिलेने सनी गायकवाड याला वेळोवेळी पैसे दिले होते. ते पैसे फिर्यादी परत मागत होत्या. त्या कारणातून त्यांच्यात वाद सुरू होते. दरम्यान शुक्रवारी दुपारी आरोपीने फिर्यादी महिलेला फोन करून ‘मी तुझ्या घरी येतो व तुझे काय असतील ते पैसे देऊन टाकतो’, असे सांगून घराच्या खाली बोलावून घेतले. त्यानंतर पैशाच्या कारणातून त्याने चाकूने फिर्यादीवर वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Attempted murder by stabbing divorced wife